बारावीचा निकाल जाहीर, नागपूर विभागाचा निकाल 90.35 टक्के

मुलींचे उत्तीर्णतेचे प्रमाण 93.14 टक्के तर मुलांचे प्रमाण 87.63 टक्के

नागपूर :- उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इयत्ता 12 वी) परीक्षेचा निकाल आज जाहीर झाला. राज्याचा निकाल 91.25 टक्के लागला असून नागपूर विभागाचा निकाल 90.35 टक्के लागला आहे. यात मुलींचे उत्तीर्णतेचे प्रमाण 93.14 टक्के तर मुलांचे उत्तीर्णतेचे प्रमाण 87.63 टक्के आहे. नागपूर विभागात गोंदिया जिल्ह्याचा निकाल सर्वाधिक 93.43 टक्के लागला आहे.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण अशा नऊ विभागीय मंडळांमार्फत 21 फेब्रुवारी ते 21 मार्च 2023 दरम्यान घेण्यात आलेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इयत्ता 12 वी) परीक्षेचा निकाल आज ऑनलाईन पध्दतीने महामंडळाने अधिकृत केलेल्या संकेतस्थळांवर जाहीर झाला. या परीक्षेसाठी विज्ञान, कला, वाणिज्य व व्यवसाय अभ्यासक्रम शाखेतील एकूण 14 लाख 16 हजार 371 विद्यार्थी प्रविष्ट झाले होते यापैकी 12 लाख 92 हजार 468 विद्यार्थी उत्तीर्ण झाले व निकालाची टक्केवारी 91.25 टक्के आहे.

माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या नागपूर विभागातील या परीक्षेसाठी विज्ञान, कला, वाणिज्य व व्यवसाय अभ्यासक्रम शाखेतील एकूण 1 लाख 52 हजार 121 विद्यार्थी प्रविष्ट झाले होते यापैकी 1 लाख 37 हजार 455 विद्यार्थी उत्तीर्ण झाले व निकालाची टक्केवारी 90.35 टक्के आहे. एकूण विद्यार्थ्यांपैकी उत्तीर्णांमध्ये 67 हजार 442 मुले तर 70 हजार 6 मुली आहेत. यानुसार मुलींचे उत्तीर्णतेचे प्रमाण 93.14 टक्के तर मुलांचे उत्तीर्णतेचे प्रमाण 87.63 टक्के आहे.

नागपूर विभागातील सहा जिल्ह्यांमध्ये गोंदिया जिल्ह्याचा निकाल सर्वाधिक 93.43 टक्के लागला आहे. यात 95.64 टक्के मुली तर 91.32 टक्के मुले उत्तीर्ण झाले आहेत. गडचिरोली जिल्ह्याचा निकाल 92.72 टक्के लागला आहे. यात मुलींचे उत्तीर्णतेचे प्रमाण 94.70 टक्के तर मुलांचे प्रमाण 90.83 टक्के आहे. भंडारा जिल्ह्याचा निकाल 92.19 टक्के लागला आहे. यात 95.50 टक्के मुली तर 89.16 टक्के मुले उत्तीर्ण झाले आहेत. चंद्रपूर जिल्ह्याचा निकाल 90.69 टक्के लागला आहे. यात मुलींचे उत्तीर्णतेचे प्रमाण 93.39 टक्के तर मुलांचे प्रमाण 88.03 टक्के आहे. नागपूर जिल्ह्याचा निकाल 89.81 टक्के लागला आहे. यात 92.41 टक्के मुली तर 87.21 टक्के मुले उत्तीर्ण झाले आहेत. वर्धा जिल्ह्याचा निकाल 84.51 टक्के लागला आहे. यात मुलींचे उत्तीर्णतेचे प्रमाण 89.04 टक्के तर मुलांचे प्रमाण 80.11 टक्के असल्याचे नागपूर विभागीय मंडळाच्यावतीने कळविण्यात आले आहे.

नागपूर विभागात 6 हजार 748 विद्यार्थी प्राविण्याने (75 टक्के पेक्षा जास्त गुण) उत्तीर्ण झाले आहेत. प्रथम श्रेणीत (60 ते 74 टक्के गुण) उत्तीर्ण होणारे विद्यार्थी 32 हजार 454 आहेत. द्वितीय श्रेणीत 71 हजार 359 विद्यार्थी (45 ते 59 टक्के गुण) तर तृतीय श्रेणीत उत्तीर्ण होणारे विद्यार्थी 26 हजार 894 आहेत.

आजच्या निकालात नऊ विभागीय मंडळाच्या नियमित विद्यार्थ्यांचा एकत्रित निकाल 91.25 टक्के तर पुर्नपरिक्षार्थींचा एकूण निकाल 44.33 टक्के लागला आहे. खाजगी विद्यार्थी म्हणून प्रविष्ट झालेल्या विद्यार्थ्यांचा निकाल 82.39 टक्के लागला आहे. विज्ञान शाखेचा 96.09 टक्के, कला शाखेचा 84.05 टक्के, वाणिज्य शाखेचा 90.42 टक्के, व्यवसाय अभ्यासक्रम शाखेचा 89.25 टक्के तर आयटीआय शाखेचा 90.84 टक्के निकाल लागला आहे.

Email Us for News or Artical - [email protected]
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com