कामठी खदान येथील इगल काटाघर येथे चोरी

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

– नेटवर्क सेवेचे युपीएस व बॅटरी असे एकुण ५४५०० रूपयाचा मुद्देमाल चोरी

कन्हान :- वेकोलि कामठी खुली कोळसा खदान येथे इगल १०० टन काटाघर मधिल नेटवर्क सेवा टेलिकॉम पोस्टिंग रेलटेल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया नागपूर या कंपनीचे युपीएस व बॅटरी असे एकुण ५४५०० रूपया चा मुद्देमाल चोरी झाल्याने कन्हान पोस्टे ला अज्ञात आरोपी विरूध्द गुन्हा दाखल करून कन्हान पोलीस पुढील तपास करित आरोपीचा शोध घेत आहे.

टेलिकॉम पोस्टिंग रेलटेल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया नागपूर ही कंपनी वेकोलि कामठी खुली खदान ला एमपीएलएस नेटवर्क ची सेवा ५ वर्षाच्या करार नुसार मागिल ३ वर्षा पासुन देत आहे. त्यानुसार इगल १०० टन काटाघर कामठी खदान येथे कंपनीच्या रँक मध्ये युपीएस ३ किलो व्हँट, बैटरी सेट १२ व्होल्ट चे ६ नग राउटर, स्वीच असे सामान लावलेले आहे. शनिवार (दि.८) जुन २०२४ ला रात्री १.३० ते २.३० वाजता दरम्यान नेटवर्क बंद झाले. (दि.९) जुन ला किष्णा बोबडे व चेतन बावणे वेकोलि सुरक्षारक्षक यांना इगल १०० टन काटाघर कामठी येथे नेटवर्क बंद का झाले ते पहायला पाठविले असता त्याने फोनवर माहीती दिली की कार्यालयात ठेवलेले युपीएस व बॅटरी दिसुन येत नसल्याने चोरी झाल्याचे सांगितले. त्यानुसार फिल्ड इंजिनीअर वैभव आटनेरे व अंकीत गूहे हे सदर स्थळी जावुन पाहणी केली असता युपीएस फुजी कंपनीचा ३ किलो व्हँट किमत ३५०००, एक्साइड कंपनीची बॅटरी सेट ४२ एएच १२ व्होल्टचे ६ नग कि. प्रत्येकी ३२०० रू. प्रमाने एकुण १९२०० रू असे एकुण ५४५०० रूपयाचा मुद्देमाल दिसुन येत नसल्याने चोरी झाल्या ची खात्री करून सांगितले. यावरून गुरूवार (दि.१३) जुन २०२४ ला कन्हान पोस्टे ला फिर्यादी मंजित मंगल पाटील ४१ वर्षे, झोनल मॅनेजर टेलिकॉम पोस्टिंग रेलटेल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया नागपुर यानी वरील प्रमाणे युपीएस व बॅटरी सेट एकुण किमत ५४५०० रूपयाचा मुद्देमाल अज्ञात आरोपीने चोरी केल्याच्या तक्रारीवरून कन्हान ठाणेदार उमेश पाटील यांच्या मार्गदर्शनात पो.हवा. नरेश श्रावणकर यानी अप क्र ४०७/२४ कलम ३८० भादंवि अन्वये अज्ञात आरोपी विरूध्द गुन्हा दाखल करून कन्हान पोलीस पुढील तपास करित आरोपीचा शोध घेत आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

अन… ग्रामस्थ झाले बोलते…

Fri Jun 14 , 2024
Ø ‘जनसंवादातून सुशासनाकडे’ कार्यक्रमात नागरिकांनी मांडल्या समस्या Ø पहिल्यांदाच दूरदृष्य प्रणालीद्वारे दुर्गम भागात प्रशासनाचा संवाद Ø महिलांचा लक्षवेधी सहभाग Ø जिल्हा मुख्यालयापासून 150 किलोमीटर अंतरावरील दुर्गम व नक्षलग्रस्त भागातील जनतेशी थेट संवाद. लोकाभिमूख कामातून जनतेचा विश्वास संपादन करा – जिल्हाधिकारी यांच्या यंत्रणेला सूचना गडचिरोली :- जिल्ह्यातील अतिदुर्गम अशा ग्रामीण भागात जेथील अनेक नागरिकांनी आजपर्यंत जिल्हास्तरीय वा तालुकास्तरीय कार्यालय बघीतले नाही, […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com