नागपूर :- नागपूर महानगरपालिका क्षेत्रात खाजगी मालमत्तेवर आकाशचिन्ह करीता स्ट्रक्चर उभारून आकाशचिन्ह प्रदर्शीत करण्याची सक्षम प्राधिकरणांनी अनुमती प्रदान करून 1053 उभारलेली आकशचिन्ह आहेत.
महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम चे कलम 244 व महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम (आकाशचिन्ह व जाहिरात प्रर्दशीत करण्याचे नियमन आणि नियंत्रण) नियम 2022 च्या तरतूदी अंतर्गत महानगरपालिका क्षेत्रात आकाशचिन्ह करीता स्ट्रक्चर उभारून आकाशचिन्ह प्रदर्शीत करण्याची अनुमती मनपा सक्षम प्राधिकरणाकडून देण्यात येते, उक्त तरतुदी अंतर्गत अनुमती देतांना जवळपास 13 दस्ताऐवज सादर करून घेऊन दस्ताऐंवजाचे तपासणी व मौका चौकशी करून अनुमती देण्यात येते. आकाशचिन्ह करीता आवश्यक स्ट्रक्चर हे स्ट्रक्चरल इंजीनियर कडून डिझाईन करून घेतल्या प्रमाणेच उभारण्यात आल्याचे व उभारलेल्या स्ट्रक्चर स्टॅबीलीटी हे स्ट्रक्चरल इंजीनियर मार्फत प्रमाणीत करून घेतल्या जाते.
नागपूर महानरगपालिका क्षेत्रातंर्गत उभारलेली आकाशचिन्ह बाबत विस्तृत माहिती व उभारलेली आकाशचिन्हांचे GIS location बाबत खाजगी ऐजन्सी द्वारा आर्थिक वर्ष 2021-22 व आर्थिक वर्ष 2022-23 या कालावधीत सर्वेक्षण करून माहिती प्राप्त करून घेण्यात आली व ज्या अभिकरणाचे आकाशचिन्ह फक्त उभारलेले आढळले त्या अभिकरणांनी नियमांचे उल्लंघन केल्याचे आढळले त्या अभिकरणांवर नियमान्वये कार्यवाही करण्यात आली.
परंतू मुंबई येथील घाटकोपर मध्ये घडलेली घटना नागपूर क्षेत्रात घडू नये म्हणून मा. आयुक्त तथा प्रशासक महोदयांनी आकाशचिन्ह परवाना विभाग, मनपास निर्देश दिलेत की पुनश्च नागपूर महानगरपालिका क्षेत्रात प्रदर्शीत आकाशचिन्ह करीता सर्वेक्षण करावे, सर्वेक्षणात आकाशचिन्ह हे अनुमती दिलेल्या आकारा इतकेच आहे की कसे ? आकाश चिन्ह अनुमती अन्वये आहे किंवा बिनाअनुमतीचे आहे, तसेच आकाशचिन्हा करीता उभारलेले स्ट्रक्चरच्या स्थिरताबाबत स्ट्रक्चरल ऑडीट झाले आहे किंवा कसे या बाबत पंधरा दिवसाच्या आत सर्वेक्षण करावे व सर्वेक्षाणात जर असे आढळले की अभिकरणांनी विनाअनुमतीने आकाशचिन्ह उभारले किंवा अनुमती देतांना ज्या अटी व शर्ती अन्वये बंधने घातलेली आहेत त्या बंधनाचे उल्लंघन केलेले आहे अशा अभिकरणांवर नियमान्वये त्वरीत कार्यवाही करण्यात यावी.
आयुक्त तथा प्रशासक महोदयांचे निर्देशान्वये व नगर विकास विभाग महाराष्ट्र शासनाचे दिनांक 14/05/2024 च्या पत्रातील निर्देशान्वये नागपूर क्षेत्रातील आकाशचिन्हांचे व ज्यावर आकाशचिन्हे उभारले त्या स्ट्रक्चरचे सर्वेक्षण होण्याकरीता आकाशचिन्ह परवाना विभाग द्वारा दोन पथक तयार करण्यात आले असून दिनांक 15/05/2024 बुधवार पासून सर्वेक्षणाचे काम सुरू करण्यात येणार आहे व उल्लंघन करण्या-या अभिकरणावर नियमांन्वये कार्यवाही सुरू करण्यात येत आहे.