नागपूर :- केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून नागपूर शहरात सुरू असलेल्या खासदार क्रीडा महोत्सवातील लॉन टेनिस स्पर्धेमध्ये राज बागडीने पुरूष एकेरीत तर मिष्का तायडेने मुलींच्या गटात अजिंक्यपद पटकाविण्याची कामगिरी केली.
रामनगर टेनिस कोर्टवर पार पडलेल्या लॉन टेनिस स्पर्धेच्या अंतिम फेरीमध्ये मिष्का तायडेने मुलींच्या 16 वर्षाखालील आणि 14 वर्षाखालील अशा दोन गटात प्रतिस्पर्धकांना पराभूत करीत जेतेपदाचे दुहेरी मुकूट प्राप्त केले. मिष्का तायडेने 16 वर्षाखालील गटात श्रर्वरी श्रीरामेचा 6-4 ने तर 14 वर्षाखालील गटात सुरमयी साठेचा 6-1 अशा गुणांनी पराभव केला. पुरूष एकेरीमध्ये राज बागडीने प्रतिस्पर्धी तेजल पाल ला 6-3, 6-2 अशी दोन सेटमध्ये मात दिली. पुरूष दुहेरीमध्ये राज बागडी आणि अचिंत्य वर्मा या जोडीने अजय नेवारे व कशीत नगराळे या जोडीचा 6-4, 6-3 असा दोन सेटमध्ये पराभव करीत विजय संपादित केला.
विजेत्यांना रोष पुरस्कार प्रदान करून गौरविण्यात आले. पुरस्कार वितरण सोहळ्याला प्रमुख अतिथी म्हणून भाजपा पश्चिम नागपूरचे अध्यक्ष विनोद कन्हेरे, माजी नगरसेवक प्रमोद कौरती, स्पर्धेचे कन्वेनर सतीश वडे, नागपूर डिस्ट्रीक्ट हार्डकोर्ट टेनिस असोसिएशनचे अशोक भिवापुरकर, डॉ. सुधीर भिवापुरकर, विक्रम नायडू आदी उपस्थित होते.
निकाल (विजेता व उपविजेता)
10 वर्षाखालील मुले : कबीर पंचमतिया मात विहान तवानी 6-5(4)
10 वर्षाखालील मुली : तिआना ठक्कर मात मनस्वी फुके 6-1
12 वर्षाखालील मुले : प्रणव गायकवाड मात विवान पारीख 6-1
12 वर्षाखालील मुली : सुचिता त्रिपाठी मात इन्सीया कमाल 6-0
14 वर्षाखालील मुले : अहान शोरी मात अक्षत दक्षिणदास (retired hurt)
14 वर्षाखालील मुली : मिष्का तायडे मात सुरमयी साठे 6-1
16 वर्षाखालील मुले : हेरंभ पोहाणे मात अक्षत दक्षिणदास 6-4
16 वर्षाखालील मुली : मिष्का तायडे मात श्रर्वरी श्रीरामे 6-4
खुला गट पुरूष एकेरी : राज बागडी मात तेजल पाल 6-3, 6-2
पुरूष दुहेरी : राज बागडी व अचिंत्य वर्मा मात अजय नेवारे व कशीत नगराळे 6-4, 6-3