– स्थानिक गुन्हे शाखा, नागपूर ग्रामीणची कारवाई
नागपुर / पारशिवनी – दि. 03/05/22 रोजी मौजा इटगांव, दिघलवाडी शिवारातील गौरव धनराज सादतकर यांचे शेतामध्ये एक अनोळखी पुरुषाचे बेवारस प्रेत जळालेल्या अवस्थेत पडून असल्याची माहिती पोलीसांना प्राप्त झाली. त्यावरुन स्थानिक गुन्हे शाखा नागपूर ग्रामीण येथील पोलीस पथकाने घटनास्थळी जावून प्रत्यक्ष पहाणी केली असता नमुद अनोळखी प्रेताचा खून झाल्याचे प्रथमदर्शनी दिसून आले. यासंबधात पो.स्टे. पारशिवनी येथे गुन्हे रजि.नं. 158/2022 कलम 302, 201, 436 भादवि प्रमाणे अज्ञात आरोपीविरुध्द गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे. सदर गुन्हयात मृतकाची ओळख पटवून अज्ञात आरोपीचा शोध घेणेबाबत नागपूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक विजयकुमार मगर यांनी आदेश दिले व स्थानिक गुन्हे शाखा नागपूर ग्रामीणचे पोलीस निरीक्षक ओमप्रकाश कोकाटे यांचे नेतृत्वात 03 विशेष पथक गठीत करुन गुन्हयाची उकल करण्याचे निर्देश दिले.
पोलीस अधीक्षक नागपूर ग्रामीण यांचे आदेशान्वये स्था.गु.शा.चे पथकाने सदर गुन्हयाचा समांतर तपास सुरु केला. तपासादरम्सान सोशल मिडीया व्हाट्सएप व्दारे मृतकाचे वर्णन व छायाचित्रे प्रसारीत केली होती. दि. 05/05/2022 रोजी स्थानिक गुन्हे शाखा ना.ग्रा. चे पथक नागपूर शहरात मृतकाची ओळख पटविणे कामी फिरत असतांना गुप्त माहिती मिळाली की, पुनापुरा नागपूर येथील नितेश मुरलीधर सेश्लोकार वय 26 वर्षे, हा मागील 3 ते 4 दिवसापासुन गायब आहे. यावरून स्थानिक गुन्हे शाखा टिमने त्याचे घर गाठुन त्याचे फोटो दाखवुन वर्णनावरून त्याचा भाऊ मंगेश मुरलीधर सेलोकार याने ओळखुन त्याचा भाऊ नितेश मुरलीधर सेलोकार असल्याचे सांगितले.
चौकशी मध्ये नितेश हा गिरीधर उर्फ संजय सुखराम पारधी, रा. गणगौरी नगर, पारडी यांचे मालकीचे ट्रकवर ड्रायव्हर म्हणुन कामाला होता अशी माहिती मिळाली व गिरीधरने त्याची गाडी चा चालक चंद्रशेखर उर्फ गोलु जगन्नाथ साहु वय 26 वर्षे, रा. पारडी नागपूर यांने स्वतः तब्येत खराब झाल्याने बिलासापुर छत्तीसगड येथे गाडी घेवुन जाणेकरीता नितेश सेलाकार यास आणले. तो दिनांक 11.04.2022 ला गाडीत ऑईलचे बॉक्स घेवुन बिलासपुरला गेला व माल खाली केला. तेव्हा पासुन तो तिथेच होता त्यांनी रायपुर वरून गाडीत लोखंडी अॅंगल पाईप 25 टन माल लोड करून पिपरीया मध्यप्रदेश करीता निघाला. गाडीचे टायर हे देवरी समोरील घाटात खराब झाल्याने संजय याने गोलु व आरोपी अक्षय उर्फ कमांडो भगवान मसराम वय 26 वर्षे, रा. शांतीनगर नागपूर यास सोबत घेवुन पिंटु सेलोकार यांची चारचाकी स्विफ्ट डिसायर भाडयाने घेवुन गाडीने देवरी येथे जावुन गाडी दुरूस्त केली. त्यादरम्यान सर्व चारही लोकांनी मिळुन प्लानींग केले की, गाडीतील 25 टन माल बाहेर विकुन गाडी जाळुन इन्षोरंस क्लेम करायाचा, व त्यातुन मिळणारे पैसे चौघामध्ये वाटुन घेवु. असे ठरवुन 25 टन माल कोहमारा गोंदिया रोडवर नातेवाईकाकडे उतरविला व खाली गाडी घेवुन नागपूरला आणुन दुसÚयाच दिवशी दिनांक 02.05.2022 चे रात्री दरम्यान ती गाडी अक्षय याने चालविली व त्याचे सोबत नितेश कारमध्ये संयज आणि गोलु असे दोन गाडी नागपूरवरून कामठी- कन्हान-आमडी-पारशिवनी मार्गे खापा बडेगाव रावणवाडी घाटाच्या कच्या रस्त्यात नेवुन गाडीवर सोबत आणलेला डिझेल टाकुन नितेश व अक्षय ने गाडी जाळली संजय, गोलू व अक्षय यांना वाटले की, नितेश हा पैसे घेवुन संपल्यानंतर फुटू शकतो व पोलीसांना सांगु शकतो असा संशय वाढल्याने त्यांनी त्याच्या काटा काढण्याचे ठरविले.
त्यानंतर कार मध्ये संजय पारधी, चंद्रशेखर उर्फ गोलु साहु, अक्षय मसराम व मृतक नितेश सेलोकार असे बडेगाव खापा पाटनसावंगी, दहेगाव रंगारी, खापरखेडा मार्गे इटगाव शेत शिवार येथे घेवुन गेले व सदर परिसर हा अक्षय मसराम याचे पाहणीतील होता त्याच ठिकाणी तिघांनी मिळुन त्याचा धारदार शस्त्राने खुन करून नितेश चा मृतदेह शेजारील झोपडीतील तुराटीच्या ठिगवर ठेवुन पेट्रोलपंप पारडी येथुन विकत घेतलेल्या 4 लिटर पेट्रोल टाकुन जाळले व तेथुन पळुन गेले. आग लावतांना संजय याच्या पायास जळाल्याचे निशान झाले. तसेच गोलु याचे दोन्ही पाय जळाले आहे. नंतर ते खापरखेडा मार्गे कामठी ऑटोमेटी चौक ते पारडी अशाप्रकारे ते घरी पोहचले. व नितेश याने मालासह ट्रक गायब केला असा बयाण करीत होते. सदर गुन्हयात अटक आरोपी नामे 1) गोलू उर्फ चंद्रशेखर वल्द जगनन्नाथ शाहू वय 26 वर्ष, रा. प्लॉट नं. 47, माही कॉन्हेंट जवळ, साम नगर, पारडी, जि. नागपूर, 2) गिरीधारी उर्फ संजय सुखराम पारधी वय 35 वर्ष, रा. प्लॉट नं. 14, गणगवरी नगर, सत्यम सोसायटी, पारडी, नागपूर आणि 3) अक्षय उर्फ कमांडो भगवान मसराम वय 28 वर्ष, रा. रेल्वे क्रॉसिंग, मिनी माता नगर, नागपूर यांचा प्रत्यक्ष सहभाग असल्याने त्यांना ताब्यात घेतले. सर्व आरोपीनी गुन्हयाची कबुली दिलेली आहे. व पुढील तपास कामी आरोपी व वाहन पोलीस स्टेशन पारशिवनी यांचे स्वाधिन केले. तपास पारशिवनी पोनि राहुल सोनवणे करीत आहेत.
सदर कार्यवाही ही नागपूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक विजयकुमार मगर व अपर पोलीस अधीक्षक राहुल माकणीकर यांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखा, नागपूर ग्रामीणचे पोलीस निरीक्षक ओमप्रकाश कोकाटे, सहा. पोलीस निरीक्षक, राजीव कर्मलवार, जितेंद्र वैरागडे, अनिल राऊत, पोलीस हवालदार विनोद काळे, ज्ञानेश्वर राऊत, गजेन्द्र चौधरी, अरविंद भगत, दिनेश आधापूरे, निलेश बर्वे, राजेन्द्र रेवतकर, पोलीस नायक आशिष मुंगळे, शैलेश यादव, उमेश फुलबेल, विपीन गायधने, अमोल वाघ, प्रणय बनाफर, महेश बिसने, बालजी साखरे, अमृत किनगे, रोहन डाखोरे, विरेन्द्र नरड चालक सहा.फौज. साहेबराव बहाळे, पोहवा. अमोल कुथे व सायबर सेल चे सतिश राठोड यांनी पार पाडली.