नागपुर – मुत्सदी राजकारणी व माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची जयंती राष्ट्रीय एकात्मता दिन म्हणून पाळण्यात येते. या अनुषंगाने मनपा मुख्यालयातील डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती सभागृहात महापौर दयाशंकर तिवारी इंदिरा गांधी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी मनपाचे अतिरिक्त आयुक्त राम जोशी, उपायुक्त सर्वश्री निर्भय जैन, रवींद्र भेलावे, विजय देशमुख, पशुचिकित्सा अधिकारी डाॅ.गजेंद्र महल्ले,वअग्निशमन विभागाचे केंद्राप्रमुख राजेंद्र दुबे, सहायक जनसंपर्क अधिकारी प्रदीप खर्डेनवीस आदी उपस्थित होते.
यावेळी महापौर दयाशंकर तिवारी यांनी उपस्थितांना राष्ट्रीय एकात्मता दिनाची शपथ दिली.
दिनेश दमाहे
9370868686