अंगणवाडी सेविका व मदतनीसानी केली आयुक्तांच्या परिपत्रक आदेशाची होळी

संदीप कांबळे, कामठी
कामठी ता प्र 6:- कोव्हीड 19 हा संसर्गजन्य आजार लाभार्थी बालकांमध्ये पसरू नये यासाठी शासनाचे 20 मार्च 2020 चे पत्रांन्वये संपूर्ण राज्यातील अंगणवाडी केंद्र बंद करण्यात आली होती .कोव्हीड 19 चा प्रादुर्भाव कमी झाल्यामुळे अंगणवाडी केंद्राच्या सेवा दिनांक 29 एप्रिल 2022 पूर्ववत कार्यान्वित करणेबाबत शासनाने मान्यता दिली आहे त्यामुळे आताच सर्वच सुट्ट्या देणे संयुक्तिक होणार नाही तसेच सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशान्वये अंगणवाडी लाभार्थ्यांना 300 दिवस आहार वाटप करणे आवश्यक असल्याने अंगणवाडी सेविका व मदतनीसांना आळीपाळीने देण्यात येणाऱ्या 16 दिवसाच्या उन्हाळी सुट्ट्या रद्द करून त्या उन्हाळी सुट्ट्या सात दिवसाच्या करण्यात आल्या तसे परिपत्रक एकात्मिक बाल विकास सेवायोजना महाराष्ट्र राज्य मुंबई चे आयुक्त रुबल अग्रवाल यांनी जारी केले.या परिपत्रकाच्या आदेशांनव्ये अंगणवाडी सेविका व मदतनीसांचा उन्हाळो सुट्ट्यामध्ये पारिवारिक कार्यक्रम , फिरण्याच्या कार्यक्रमावर विरजण पडल्यामुळे तीव्र असंतोष निर्माण करीत कामठी येथील अंगणवाडी सेविका व मदतनीसांच्या वतीने रणाळा येथील एकात्मिक बाल विकास प्रकल्प केंद्र कार्यालय समोर आयुक्तांच्या आदेशाची होळी करण्यात आली.तदनंतर बालविकास प्रकल्प अधिकाऱ्यांना सामूहिक निवेदन सादर करण्यात आले.
या आंदोलनाचे नेतृत्व विशाखा हाडके यांच्या नेतृत्वात करण्यात आले असून याप्रसंगी विद्या गजभिये सह मोठ्या संख्येत अंगणवाडी सेविका व मदतनीस उपस्थित होते.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

जि प सदस्य प्रा.अवंतिकाताई रमेश लेकुरवाळे यांचा अनोखा उपक्रम

Fri May 6 , 2022
संदीप कांबळे, कामठी -जि.प. शाळेतील विद्यार्थ्यांची गुणवत्ता सुधारावी म्हणून उन्हाळी वर्गाचे आयोजन कामठी ता प्र 6:-विद्यार्थ्यांनी गुणवत्तेच्या मुख्य प्रवाहात यावे म्हणून शिक्षक समाजसेवक नेमून नियमित शिक्षक व शिक्षण समाज सेवक यांच्या मदतीने अभ्यासात थोडे मागे राहिलेल्या विद्यार्थ्यांसाठी उन्हाळी वर्ग वडोदा-बिडगाव सर्कल मधील पांढरकवडा, खेडी, केम, वरंभा, भुगाव, वडोदा, तरोडी,नान्हा मांगली या नऊ शाळांमध्ये उन्हाळी वर्ग हा उपक्रम सुरू करण्यासाठी प्रा.अवंतिकाताई […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com