संदीप कांबळे विशेष प्रतिनिधी
-3 ग्राम एम डी जप्त,एक आरोपीस अटक,1 लक्ष 17 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त
कामठी ता प्र 26 :- स्थानिक जुनी कामठी पोलिस स्टेशन हद्दीत एम डी तस्कर बाजांचे जाळे पसरले असून या एम डी तस्करबाजांच्या मुसक्या आवळण्यासाठी जुनी कामठी पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दीपक भिताडे यांनी कंबर कसली असून या व्यवसायाशी लिप्त काही तस्कर बाज पी आय भिताडे च्या भीतीपोटी भूमिगत झाल्याचे सांगण्यात येत असून पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे काल रात्री 1 वाजता जुनी कामठी पोलिसांनी तुमडीपुऱ्यातील एका अवैध एम डी अडयावर यशस्वी धाड घालून या धाडीतून एम डी ने भरलेल्या 115 पुड्या असा एकूण 3 ग्राम एम डी,2 मोबाईल,2 वजन काटे व एक दुचाकी असा एकूण 1 लक्ष 17 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला तसेच एका आरोपीस अटक करीत दोन पसार आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अटक आरोपी मध्ये मसूद अहमद यासीन बागवान वय 40 वर्षे रा तुमडीपुरा कामठी असे आहे.ही यशस्वी कारवाही डिसीपी श्रवण दत्त ,एसीपी नलावडे यांच्या मार्गदर्शनार्थ वरिष्ठ पोलीस निरीक्षक दीपक भिताडे, पोलीस उपनिरीक्षक केरबा माकने, पोलीस उपनिरीक्षक राखुंडे व डी बी पथकाने केली असून पुढील तपास सुरू आहे.