संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- आंबेडकर पुर्व समाज स्थीतीचा आढावा दृष्टीसमोर ठेऊन, त्या काळातील विषम ते विरूद्ध लढण्यास सज्ज योद्ध्याच ऐतिहासिक संघर्ष व आंबेडकर आदोलनातील उत्तरार्ध सामोर ठेवुन जर समाज मनावर बदल घडवता आला तर वर्तमान विषम काळात एक नव परिवर्तन यशस्वी करण्यात अडचन जाणार नाही प्रतिक्रान्ती ला प्रतिउत्तर देण्यास समर्थ ठरू शकतो, फक्त आपल्यातील, बडेजाव पणा, असंघटीत पणा असंस्कारीक वृत्ती, अनिष्ट असंभ्य भबकेबाज विकृती, पाच्छात्य राहणीमान, भेदभाव उचनिचता, पद प्रतिष्ठा पैशाचा हव्यास व व्यक्ती वाद, परीवार वाद, उत्तराधिकारवाद, बेकीची वाट सोडावी लागेल, व समता स्वातंत्र्य बंधुत्व न्याय अधिकार, स्वाभिमान, आपल्यात रूजवावा लागेल, या साठीच जयभीम प्रवर्तक लोकप्रिय बाबु हरदास एल एन पंधरवाडा राबवून जुण्या ईतिहासाची पुनरावृत्ती करून गावागावात जिल्ह्या जिल्ह्या जनजागरण करून कन्हान नदीच्या काठावर हरदास स्मृती स्मारकास अभिवादन करण्यास मागिल साढेआठ दशकापासून ऐकत्रीत येवुन नव्या क्रान्ती संकल्प करतात कन्हान नदीच्या काठावर विद्रोहाचे पाणी पेटविणार्या योद्ध्याना मानवंदना देत असतात अशा शब्दात समता सैनिक दल चे मार्गदर्शक भदंत नाग दिपंकर महास्थविर या॔नी मार्गदर्शन केले.
८४व्या हरदास मेळावा निमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होते उपरोक्त कार्यक्रमास एक जानेवारी पासुन पंधरवाडा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी, वस्त्या वस्त्यात गावात जिल्ह्याबाहेरील विविध संस्था संघटन, व स्थानिय शासकिय निमशासकिय प्रशासन, पोलिस प्रशासन, कामठी कन्ट्रोमेंट बोर्ड, नगर परिषद, पंचायत कामठी कन्हान तहसीलदार कामठी पारसिवनी, मुख्याधिकारी नगर अध्यक्ष, पदाधिकारी यांनी प्रशासनिक बाबी हाताळतांना येणार्या अलोट नागरिकाच्या सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्या बंद्दल अभिनंदन, ज्या ज्या संस्था संगठना चा सहभाग लाभला त्यात जयभीम प्रवर्तक लोकप्रिय बाबु हरदास एल एन स्मृती समिती, बाबु हरदास एल एन बहुउद्देशिय संस्था हरदास नगर अर्बन क्रेडिट को ऑप सोसायटी नागपुरकामठीकन्हान येथील पत्रकार संघ हरदास शैक्षणिक सांस्कृतिक संस्था, हरदास शाळा ईमारत बांधकाम फंड कमेटी आकांक्षा स्टडी सेंटर, हरदास फाऊँडेशन, हरदास युवा मंडळ,हरदास वाचनालय प्रशिक अखाडा,बौद्ध ईतिहास संस्कृती संशोधन संस्था यांचे मनपुर्वक अभिनंदन लाख लाख बधाई मंगल कामना.