संदीप कांबळे, विशेष म्हणजे
-मटन मार्केट ची घानीवस्था ग्राहकाना देत आहे रोगाचे निमंत्रण
कामठी :- कामठी नगर परिषद हद्दित येणाऱ्या नगर पालिका निर्मित भव्य मटण मार्केट परिसरात घाणीचे साम्राज्य पसरले असून येथील दुर्गंधीमुळे मटण मार्केट मध्ये येणाऱ्या ग्राहकांना बिनधास्तपने आजाराचे निमंत्रण देत असून नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे तसेच बकऱ्याची कत्तल करणाऱ्या जागेत डुकरांचा संचार दिसत आहे मात्र स्थानिक नगर परिषद प्रशासनाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे येथे ग्राहकांच्या व दुकानदारांच्या भावनेशी सर्रास खेळ खेळला जातो.
येथील शुक्रवारी बाजार परिसरात उघड्यावर मटण विकणारे मटण विक्रेते, मच्ची विक्रेते तसेच चिकन विक्रेते एकत्र बसून त्यांना योग्य सोय व्हावी व नागरिकाना सोयीचे व्हावे यासाठी नगर परिषद च्या वतीने येथील कामठी कृषी उत्पन्न बाजार समिती नजीकच्या जागेत भव्य मटन मार्केट उभारण्यात आले ज्याचा लोकार्पण 19 फेब्रुवारी 2009 ला माजी मुख्यमंत्री दिवंगत विलासराव देशमुख यांच्या शुभ हस्ते करण्यात आले होते यावेळी कांग्रेस पक्षाचे माणिकराव ठाकरे,माजी खासदार मुकुल वासनिक,विलास मुत्तेमवार , इमरान किदवई,बाळासाहेब थोरात, यादवराव भोयर, देवराव रड़के तसेच तत्कालीन नगराध्यक्ष शकूर नागानी प्रामुख्याने उपस्थित होते.
या मटन मार्किट मध्ये बक्रयाचे मटन, कोंबड़ी आणि मासोळया ह्याएकाच ठिकाणी मिळाव्या तसेच शहरासह ग्रामीण भागातून येणाऱ्या ग्राहकांना सोयीचे व्हावे या मुख्य उद्देशाने वैशिष्ट्यपूर्ण योजनेच्या निधीतुन हे भव्य मटण मार्केट उभारण्यात आले होते कसेबसे या ठिकाणी तात्पुरते काही दिवस सगळे मटण विक्रेत्यांनि व्यवसाय थाटले मात्र या ठिकाणी ग्राहकांचा मिळत असलेला अल्प प्रतिसाद च्या नावावर येथील मासोळे व चिकन विक्रेत्यांनी पूर्ववत ठिकाणी उघड्यावरच दुकान मांडले तर कायम राहले ते मात्र बकरे मटण विक्रेते..तर यामटन मार्किट परिसरात होणाऱ्या घानिमुळे परिसरातील नागरिकासह येथे येणाऱ्या ग्राहकांचे आरोग्य धोक्यात न यावे व घानीची विल्हेवाट लागावी यासाठी माजी नगराध्यक्ष नीरज यादव यांच्या कार्यकाळात 18 लक्ष 50 हजार रुपये चा निधि खर्च करुन फ़ायटोरिड टेक्नॉलॉजी प्रकल्प उभारण्यत आला हा प्रकल्प मटन मार्किट मध्ये निर्माण होणाऱ्या साँड़पानी तसेच घानीवर प्रथम बायलोजिकल ट्रीटमेंट त्यानंतर फिजिकल ट्रीटमेंट व अंतिम रासायनिक ट्रीटमेंट या तीन प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर स्वच्छ पाणी बाहेर पडणार व हे स्वछ पाणी मटन मार्केट च्या सफाईकरिता वापरण्यात येणार असे प्रयोजन होते मात्र नगर परिषद च्या अक्षम्य दुर्लक्ष्य मुळे हा प्रकल्प शोभेची वस्तू ठरला असून खर्ची घातलेले 18 लक्ष 50 रुपये चा खर्चिलानिधी हा निरर्थक ठरला आहे तर आजच्या स्थितीत कत्तल केलेल्या बकऱ्याचे हे रक्त वाहत असून घाण पसरलेली असते या घाणीच्या बाजूला डुकरांच्या संचार असतो तसेच या परिसरातील सार्वजनिक स्वछतागृह, शौचालयाची दुरवस्था झालेली आहे तर येथील एका मूत्रालाय कक्षाला ताळेबंदी करन्यात आलेली आहे यासंदर्भात येथील दुरावस्थे संदर्भात येथील मटन विक्रेत्यांनी सुव्यवस्थेची मागणी केली मात्र यांच्या यामाग्निची नेहमी पूंगि वाजविन्यात आल्याने येथील कायम असलेली दुरावस्था ग्राहकना बिनधास्त पने रोगराई चे निमंत्रण देत आहे
बॉक्स :- याच मटन मार्किट मध्ये एका बाजूला 11 गाळें हे मासोळें विक्रेत्यना देण्यात आले होते हे दुकान गाळें येथील मासोळी विक्रेत्यानी झालेल्या बाजार लीलावातून खरेदी करुण घेतले मात्र येथील दुरावस्थेमुळे तसेच एकीकडे व्यावसायची स्पर्धा तर दुसरीकडे घानीची दुरावस्था आहे ज्यामुळे येथील मच्छी विक्रेत्यानी कायमचा रामराम ठोकला परिणामी आजहि हे दुकान गाळें नामधारी उरले आहेत तेव्हा नगर परिषद प्रशासनाने याकडे लक्ष पुरविने अत्यंत गरजेचे आहे