भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी हिराबेन मोदी यांना अर्पण केली श्रद्धांजली

नागपूर :- विश्वगौरव पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आपल्या वात्सल्यातून आत्मबळ देणाऱ्या त्यांच्या मातोश्री हिराबेन यांच्या निधनाने संपूर्ण देशात शोककळा पसरली आहे, अशी श्रद्धांजली भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी शुक्रवारी अर्पण केली.

ते नागपूर येथे विधान भवन परिसरात पत्रकारांशी बोलत होते.

ते म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आईच्या वात्सत्यातून आत्मबळ लाभले. ते जेव्हा जेव्हा आपल्या मातोश्रींना भेटायचे व त्यांचा आशिर्वाद घ्यायचे त्यावेळी त्यांना प्रेरणा आणि ऊर्जा मिळत असे. संपूर्ण जगात भारताला उच्च स्थानावर नेण्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा संकल्प आहे तो पूर्ण करण्यासाठीचा आशिर्वाद त्यांना आईकडून मिळत असे. आईच्या निधनाचे दुःख सहन करण्याची शक्ती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मिळो अशी आपली जगदंबेच्या चरणी प्रार्थना आहे.

Email Us for News or Artical - [email protected]
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com