छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भव्य अश्वारुढ पुतळ्याचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते अनावरण

– अनेक वर्षांची मागणी पूर्ण; वाशिमकरांमध्ये उत्साह

वाशिम :- वाशिम नगरपरिषदेमार्फत उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भव्य अश्वारुढ पुतळ्याचे अनावरण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आज करण्यात आले.

अनेक वर्षांची मागणी पूर्ण झाल्याने वाशिमकरांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. छत्रपती शिवरायांच्या जयजयकाराने आसमंत निनादून गेला होता.

सोहळ्याला संभाजीराजे छत्रपती, पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील, खासदार भावना गवळी, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष चंद्रकांत ठाकरे, आमदार ॲड. किरण सरनाईक, माजी मंत्री महादेव जानकर, गोपीकिशन बाजोरिया, विभागीय आयुक्त डॅा. निधी पाण्डेय, जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस., जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी वैभव वाघमारे, पोलीस अधीक्षक अनुज तारे, सहायक जिल्हाधिकारी अपूर्वा बासुर आदी सोहळ्याला उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला शाळकरी विद्यार्थ्यांनी लेझीम नृत्याद्वारे मुख्यमंत्री शिंदे आणि मान्यवरांचे स्वागत केले. सोहळ्याला स्थानिक नागरिक, शिवप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारुढ पुतळ्याच्या कामासाठी नगरपरिषदेमार्फत १.२५ कोटी खर्च करण्यात आला आहे. हा पुतळा जमिनीपासून ३५ फूट उंच तर अश्वारुढ पुतळा १३ फूट उंच आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

भरधाव ट्रकने इंजिनिअरिंग फोर्थ ईयरच्या विद्यार्थिनीला चिरडले 

Mon Mar 4 , 2024
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  हिंगणा :- वायसीसी महाविद्यालयात इलेक्ट्रॉनिक ब्रांच इंजिनिअर फोर्थ इयरला शिकत असलेली रितिका रामचंद्र निनावे ही होती महाविद्यालयातील गॅदरिंग आटोपून घरी परत जात असताना वायसीसी कॉलेजच्या हॉस्टेलच्या गेट समोर मागून येणाऱ्या भरधाव ट्रकने चिरडल्यामुळे रितिकाचा जागीच मृत्यू झाला. अपघातामुळे अपघात स्थळी लोकांची गर्दी वाढली व काही काळ वाहतुकिची कोंडी झाली होती. Follow us on Social Media x facebook […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!