अरोली :- खात रेवराल जि प, गट ग्रामपंचायत घोटमुंढरी अंतर्गत येणाऱ्या सिवनी (घोटमुंढरी) येथील सद्गुरु साधना सदन सेवाश्रम येथे श्री त्रीपिंडेश्वर भगवान, अनंत श्री स्वामी अखंडानंद सरस्वतीजी महाराज, श्री श्री 1008 अनंत विद्या विभूषित स्वामी बासू जी महाराज यांच्या कृपेने एकाविंशती (२१) वार्षिक उत्सव निमित्त या आठ जानेवारीपासून सुरू असलेल्या चार दिवसीय कार्यक्रमाच्या नियोजित कार्यक्रमानुसार 11 जानेवारी शनिवारला सकाळी घोटमुंढरी गावातून आश्रमा पर्यंत प्रभात फेरी काढण्यात आली.
समारोपीय कार्यक्रम उद्या12 जानेवारी रविवारला सकाळी 11 ते साडेअकरा दरम्यान दीप प्रज्वलन, दुपारी पावणे बारा वाजता अतिथी सत्कार ,दुपारी बारा ते तीन वाजता समापन तर दुपारी तीन ते रात्री आठ पर्यंतच्या महाप्रसादाच्या कार्यक्रमा आयोजित केलेला आहे.
आश्रमाच्या भक्तगणांनी या कार्यक्रमाच्या लाभ घेण्याचे आव्हान आश्रम परिवारातील सदस्य डॉक्टर अनंत बागडे, शालिक पटले ,मनीषा, उमा सह सर्व सहकाऱ्यांनी केले आहे.