संततधार पावसाने शेतकरी सुखावला

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

-कामठी तालुक्यात रोवणीला आला वेग 

कामठी :- मागील अनेक दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने हवालदिल झालेल्या कामठी तालुक्यातील शेतकरी बांधवांना मागील दोन दिवसांपासून सुरू झालेल्या पावसाच्या जोरदार सरींनी दिलासा मिळाला आहे.या पावसामुळे पावसाच्या प्रतीक्षेत असलेला कामठी तालुक्यातील शेतकरी वर्ग सुखावला असून रोवणीची रखडलेली कामे पूर्ण करण्यासाठी धावपळीत लागला.

ऐन रोवणीच्या हंगामात पावसाने धोका दिल्याने शेतकरी बांधव चिंतातुर होते.कामठी तालुक्यात मोठ्या प्रमाणात सोयाबीन व धान पीक व कापूस प्रामुख्याने घेतले जाते. हलक्या धानाच्या परह्याची मुदत होत आल्याने शेतकरी चिंतेत आहे.आधीच धान खरेदी उशिरा झाल्याने पैसा हाती नसलेल्या शेतकऱ्यांचे दोन्ही बाजूनी मरण होते की काय अशी परिस्थिती सुद्धा काही शेतकऱ्यांची निर्माण झाली आहे. उशिरा झालेली धान खरेदी , आधीच कर्ज त्यात धानाचे पैसे जमा नाही, शिवाय ऐन हंगामात पावसाची हुलकावणी होती अशा दुष्टचक्रात सापडलेल्या शेतकऱ्यांची खूप मोठी दमछाक झाली.

तालुक्यात 50 टक्के रोवणे आटोपले असल्याची माहिती आहे उर्वरित धान रोवणीसाठी चांगल्या पावसाची गरज आहे मात्र मागील दोन दिवसांपासून सुरू झालेल्या पावसाच्या जोरदार सरीनी शेतकऱ्यांच्या आशा पल्लवोत झाल्या आहेत. रोवणी झालेल्या धानपिकाला हा पाऊस संजीवनी ठरला आहे. मात्र उर्वरीत रोवणी पूर्ण होण्यासाठी तरीही दमदार पावसाची आवश्यकता आहे .

  -कामठी तालुक्यात दीर्घ प्रतिक्षेनंतर पावसाचे आगमन झाल्याने पावसाच्या प्रतीक्षेत असलेला बळीराजा हा काहीसा सुखावला आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी खरिपाच्या पेरण्यांना व इतर शेती कामाना वेग दिला आहे.

-चिखलणीसाठी टॅक्टरचा वापर

-चिखलणीसाठी शेतात टॅक्टरचा वापर होत आहे.पूर्वी शेतात पेरणी चिखलणीसाठी चालणारे नांगर आणि त्यांना हाकणाऱ्यांचा घुमणारा आवाज सोबतच नांगर बैलाची जोडी . मात्र आजच्या आधुनिक काळात ही बैलाकरवी होणारी नांगरनीही थांबली असून त्याऐवजी शेतकरी ‘पावर टिलर’वापराकाडे वळला आहे.पूर्वी शेतकरी म्हटला म्हणजे त्यांच्याकडे असणारे डौलदार बैलांची जोडी लाकडी नांगराचे एक दोन फाळ किंवा औत आणि बैलगाडी असे चित्र जून महिना उजडला की शेतकरी जमीन मशागतीसाठी नांगर लागणाऱ्या दुरुस्ती करणे, नवीन नांगर तयार करणे. एखादा बैल कमी असल्यास बैल शोधणे ,नवीन बैल खरेदी करणे किंवा भाड्याने बैल आणणे नांगरणी चिखलणीसाठी फळीसाठी मजबूत लाकूड शोधणे अशा कामासाठी शेतकऱ्यांची लगबग सुरू होत असे.पूर्वीच्या काळी शेतकरी लावणी ,नांगरणी ,पेरणी आदी कामासाठी एकमेकांच्या शेतात जाउन मदत करत असत.आता मजुरांची टंचाई व पावसाचा अनियमितपणा त्यामुळे प्रत्येक शेतकरी आपल्या परीने आपली शेतीची कामे करण्याचा प्रयत्न करतात.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

भाजपाच्या संघटनात्मक 70 जिल्हाध्यक्षांची नियुक्ती प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची माहिती

Wed Jul 19 , 2023
मुंबई :- भारतीय जनता पार्टीच्या संघटनात्मक रचनेतील ७० जिल्हाध्यक्षांची नियुक्ती करण्यात आली आहे. भाजपा प्रदेशाध्यक्ष आ.चंद्रशेखर बावनकुळे यांनी याबाबतची घोषणा बुधवारी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहे. प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी नवनियुक्त जिल्हाध्यक्षांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. या नवनियुक्त सहकाऱ्यांच्या सोबतीने 2024 च्या महाविजयासाठी आम्ही सज्ज होत आहोत, असेही श्री. बावनकुळे यांनी प्रसिद्धी पत्रकात नमूद केले आहे .मा.जिल्हाध्यक्ष यादी-भाजपा महाराष्ट्र Follow us […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!