पारशिवनी : तालुकातिल वनपरिक्षेत्रातील आवळेघाट कक्ष क्रमाक२३४ ए २ सरक्षित वनात बिबट आजारी अवस्थेत पडुन असल्याची घटनेची माहिती वन परिक्षेत्राचे अधिकारीऱ्यांना देण्यात आली . पारशिवनी वनपरिक्षेत्र अधिकारी शालिनी शिरपूरकर यांनी घटनेचे गांभीर्य ओळखून आपल्या वन कर्मचारी सह घटनास्थळी तत्काल दाखल झाले सदर घटना स्थाळावर बिबट्याची पाहणी केली. असता प्रथम दर्शनी सदर बिबट्या आजारी असल्याचे आढळुन आले . वनपरिक्षेत्र अधिकारी शालिनी शिरपूरकर यांनी याबाबत टी सी सी नागपुर व रेस्क्यु सेंटर नागपुर याना माहीती देऊन तत्काल घटना स्थळी बिबट्या पकड़ मोहिम करिता प्राचारण करण्यात आले. रेस्क्यु सेंटर व टी सी सी ट्रान्झिट सेंटरच्या पथक घटनास्थळी पोहचल्या नंतर बिबट्या पकडण्याकरिता सायकाळीच्या सुमारास जाळे टाकुन बिट्याला जेरंबद करण्यात आले व बिबट्या आजारी असल्याने त्याला उपचारा करिता टि सी सी सेन्टर नागपुर येथे हलविले.
पारशिवनी वनपरिक्षेत्र अधिकारी शालिनी शिरपूरकर व वनकर्मी व ट्रान्झिट ट्रीटमेंट सेंटरच्या वनपरिक्षेत्रअधिकारी प्रतिभा रामटेके रेस्क्यू टीमनी ही कार्यवाही उपवनसंरक्षक डॉ . भारतसिंह हाडा , साहाय्यक वनसंरक्षक हरवीर सिंग रामटेक यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली . बचाव पथकात डॉ . सुदर्शन काकडे , पंकज थोरात पशु प्रयवेक्षक , हरेश किनकर , वनरक्षक चोकराज बहेकर , बंडू मगर , स्वप्निल भुरे , आशिष महल्ले , प्रयाग गणराज , सौरभ सुखदेवे यांचा समावेश होता .