युवा चेतना मंच तर्फे महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

कामठी :- युवा चेतना मंच तर्फे महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची 133 वी जयंती स्वामी विवेकानंद वाचनालय रनाळा येथे साजरी करण्यात आली ‌याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून भा.ज.पा कामठी तालुका ‌उपाध्यक्ष अतुल ठाकरे , रामटेक विधानसभा युवक काँग्रेसचे अध्यक्ष निखिल पाटील, कामठी विधानसभा विश्वकर्मा योजना प्रमुख अमोल‌ नागपुरे, दिव्यांग फाउंडेशन सचिव बाॅबी महेंद्र, ‌भा.ज.पा रनाळा शाखा महामंत्री हिमांशू लोंडेकर‌ जेष्ठ नागरिक संघटनेचे गणेश सपाटे , दशरथ देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत घेण्यात आली . याप्रसंगी अमोल जे नागपुरे यांनी व दिव्यांशी बोरकर यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर प्रकाश टाकले तर‌ अध्यक्षीय‌ भाषणातून निखिल पाटील यांनी ” अन्याया विरूध्द वाचा फोडून बनले बहुजनांचा आधार , मानवाला मानुस‌ म्हणुन जगण्याचा अधिकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी प्राप्त करून दिला ” असे मत या प्रसंगीत्यानी मांडले . याप्रसंगी रमण बोढारे, राधेश्याम कुल्लरकर ,आशुतोष मेंढे,स्वयम बागडे , चैतन्य बागडे, कु श्रुष्टी पिपरोडे प्रामुख्याने उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. पराग सपाटे तर आभार प्रदर्शन अक्षय खोपे यांनी केले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

अंभोऱ्यातील जलपर्यटनातून भूमिपुत्रांना रोजगार - उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Sun Apr 14 , 2024
 मांढळ गावात महायुतीच्या सभेत विजयाची हुंकार  राजू पारवेंचा ‘धनुष्य बाण’ला दिल्लीला पाठवा  जनसंवाद रथ यात्रा पोहचली रामटेक विधानसभा क्षेत्रात काही :- जगभरातील पर्यटक वाघांना पाहण्यासाठी रामटेकमध्ये येतात. जे वाघ पाहण्यासाठी येतात तेच अंभोऱ्यात जलपर्यटनाचा आनंद घेऊ शकतील. यासाठी अंभोऱ्यात जलपयर्टन प्रकल्प तयार करण्याचा मानस आहे. केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून अभोऱ्यांत पर्यावरण पूरक विकास आणि भूमिपुत्रांना रोजगार […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com