गादा येथील अल्पभूधारक शेतकऱ्याच्या मुलीने दहावी बोर्ड परीक्षेत 91 टक्के गुण पटकविले

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

– गादा ग्रामपंचायतच्या वतीने केला गौरव

कामठी :- नुकत्याच जाहीर झालेल्या दहावी बोर्ड परीक्षेत कामठी तालुक्यातील गादा येथील अल्पभूधारक शेतकऱ्याच्या मुलीने विपरीत परिस्थितीवर मात करू 91 टक्के गुण पटकविले असून गादा ग्रामपंचायत व गावकऱ्यांच्या वतीने तिचा गौरव करण्यात आला राज्य शिक्षण मंडळाचा नुकताच शालांत दहावी बोर्ड परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून कामठी तालुक्यातील गादा येथील अल्पभूधारक शेतकरी जितेंद्र बागडे यांची कन्या महक बागडे यांनी बोर्ड परीक्षेत 500 पैकी 455 गुण 91 टक्के गुण घेऊन गादा गावाचा नाव लौकिक केला आहे गादा येथील अल्पभूधारक शेतकरी जितेंद्र बागडे यांच्याकडे दीड एकर शेती असून पत्नी सरिता ला सोबत घेऊन शेती करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत आहेत अशातच त्यांची मुलगी महक सुरुवातीपासूनच अभ्यासात हुशार असल्याने तिला आर्थिक परिस्थितीकडे न बघता कामठी येथील इंग्लिश माध्यमाच्या सेंट जोसेफ कॉन्व्हेंट शाळेत पाचव्या वर्गापासून शिक्षणाकरिता घातले कोणत्याही प्रकारचे शिकवणी वर्ग न लावता महकने सुरुवातीपासूनच जिद्द, चिकाटी व कठीण परिश्रम घेऊन दहावीत उत्तम यश संपादन करण्याचा निश्चय केला होता त्यानुसार प्रतिदिन नियमित अभ्यास करून शिक्षणात अडचण आल्यास गावातील हरीश रोहतकर या तरुणांकडून काही अडचणी सोडवून घेत नियमित अभ्यास करीत होती महक अभ्यास करीत असताना आई-वडील शेतात कामाला गेले की घरातील पाणी,भांडीकुंडी सर्व कामे महक करीत होती व सोबतच शेतातील कामाकरिता वडिलांना हातभार लावण्याचे कामही करीत होती महकचे वडील जितेंद्र बागडे यांना मुलींने उत्तम गुण संपादित करावे ही अपेक्षा होती ती अपेक्षा महाक ने 91% गुण घेऊन पूर्ण केली आहे महकला पुढे स्पर्धा परीक्षेची तयारी करण्याची इच्छा असल्याचे तिने सदर प्रतिनिधी जवळ व्यक्त केले आहे महक ने आपल्या यशाचे श्रेय आई-वडील व हरीश रोहतकर या गावातील तरुणाला दिले आहे महक ने 91 टक्के गुण संपादन केल्याबद्दल गावकऱ्यांच्या वतीने तिचा गौरव करण्यात आला यावेळी नागपूर जिल्हा भाजप महामंत्री अनिल निधान ,गादा गावचे सरपंच सचिन डांगे, पोलीस पाटील वंदना चकोले ,जीवन तरंग सामाजिक संस्थेचे अध्यक्ष उमेश मस्के ,सचिव घनश्याम चकोले यांनी शाल, पुष्पगुच्छ व मिठाई देऊन गौरव केला यावेळी खुशाल येवले ,खोमराज गोरले ,अंकुश डाकरे ,मनोज मेश्राम, जितेंद्र बागडे, विनोद वाट, बिपिन मेश्राम, हरीश रोहनकर , उपस्थित होते सत्कारा प्रसंगी मार्गदर्शन करताना अनिल निधान म्हणाले महक बागडे यांनी विपरीत परिस्थितीवर मात करून दहावी बोर्ड परीक्षेत 91 टक्के गुण घेतल्याबद्दल गादा गाव व ग्रामीण भागातील शेतकऱ्यांचा मान उंचावली आहेत्याबद्दल आपण तिचा व आई वडीलाचा गौरव करीत आहो महाकला पुढील शिक्षणासाठी आपण नेहमीच मदत करणार असल्याचे सांगितले कार्यक्रमाला मोठ्या संख्येने गावकरी उपस्थित होते.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

बीकेसीपी स्कुल कन्हान चा ९८.८० टक्के निकाल

Tue May 28 , 2024
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  – तालुक्यातुन प्रथम शिवकुमार होले, व्दितीय उत्कर्ष रहाटे व तृतीय आयुष दहिफळकर.  कन्हान : – महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमि क शिक्षण मंडळ, पुणे व्दारे माध्यमिक शालांत प्रमाण पत्र ( इ.१० वी ) मार्च २०२४ च्या परीक्षेत बीकेसीपी स्कुल कन्हान चा ९८.८० टक्के निकाल लागला असुन शाळेतील १० विद्यार्थीनी ९० टक्के च्या वर गुण प्राप्त […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com