बीकेसीपी स्कुल कन्हान चा ९८.८० टक्के निकाल

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

– तालुक्यातुन प्रथम शिवकुमार होले, व्दितीय उत्कर्ष रहाटे व तृतीय आयुष दहिफळकर. 

कन्हान : – महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमि क शिक्षण मंडळ, पुणे व्दारे माध्यमिक शालांत प्रमाण पत्र ( इ.१० वी ) मार्च २०२४ च्या परीक्षेत बीकेसीपी स्कुल कन्हान चा ९८.८० टक्के निकाल लागला असुन शाळेतील १० विद्यार्थीनी ९० टक्के च्या वर गुण प्राप्त केले आहे.

मंडळामार्फत घेण्यात आलेल्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेत बीकेसीपी स्कुल कन्हान येथुन ८४ विद्यार्थी परिक्षेला बसले असुन प्राविण्य सुचित ५५ विद्यार्थी, प्रथम क्षेणीत २५, व्दितीय क्षेणीत ०३ विद्यार्थी तर ०१ विद्यार्थी अनुउर्त्तीण झाला असुन ८३ विद्यार्थी उर्त्तीण झाल्याने शाळेचा ९८.८०% निका ल लागला. यात शाळेतील शिवकुमार प्रविणकुमार होले ९४.६०% गुण प्राप्त करून शाळेतुन, पारशिवनी तालुक्यातुन प्रथम, उत्कर्ष मोतीरामजी रहाटे ९४.२० % व्दितीय तर आयुष श्रीकृष्णाजी दहिफळकर ९४ % अंक प्राप्त करित तृतीय क्रमाकं पटकाविला आहे. ४) अंश मोहणे ९२.८०%, ५) राजिव मनकानी ९२.६०%, ६) श्रीकांत कांबळे ९२.२०%, ७) ईशांत धारपुरे ९१.४०%, ८) युक्ता नाटकर ९१.२०%, ९) शक्षम मेश्राम ९०.२०%, १०) तनिश मानकर ९०.२०% असे एकुण १० विद्यार्थ्यानी ९० टक्के च्या वर गुण प्राप्त करून उर्तीण झाले आहे.

या सर्व प्राविण्य प्राप्त विद्यार्थ्याचे शाळेचे संचालक राजीव खंडेलवाल, मुख्याध्यापिका कविता नाथ, विनयकुमार वैद्य, अमित सिंग ठाकुर सह शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षिका व शिक्षकेत्तर कर्मचारी वृंदानी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या असुन या विद्यार्थ्यानी प्राविण्य प्राप्त करून शाळेचे, तालुक्याचे नाव लौकिक केल्याने कन्हान परिसरातुन अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

फोटो- शिवकुमार प्रविणकुमार होले प्रथम ९४.६०%.

२) उत्कर्ष मोतीराम रहाटे व्दितीय ९४.२०%.

३) आयुष श्रीकृष्णा दहिफळकर तृतीय ९४%.

४) अंश मोहणे ९२.८०%, ५) राजिव मनकानी ९२.६० %, ६) श्रीकांत कांबळे ९२.२०%, ७) ईशांत धारपुरे ९१.४०%, ८) कु. युक्ता नाटकर ९१.२०%, ९) शक्षम मेश्राम ९०.२०%, १०) तनिश मानकर ९०.२०%

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

वीस रक्तदात्यांनी केले स्वेच्छेने रक्तदान

Tue May 28 , 2024
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कामठी :- उन्हाळ्यात शासकीय रुग्णालयातील रक्तपेढीत रक्ताचा मोठ्या प्रमाणात तुटवडा झाल्यामुळे सामाजिक बांधिलकी जपत गादा गावचे सरपंच सचिन डांगे यांचे मार्गदर्शनात भर उन्हाळ्यात गादा गावात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते रक्तदान शिबिरात 20 रक्तदात्यांनी रक्तदान केले लाईफ लाईन ब्लड बँक नागपूरच्या वतीने रक्त संकलन केले रक्तदान शिबिराच्या रक्तदान शिबिरात सरपंच सचिन डांगे ,उपसरपंच मोहन मारबते, […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com