जबरी संभोग करणाऱ्या आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल 

एमआयडीसी बोरी:- दिनांक ०५.०३.२०१९ ते दिनांक २१.०४.२०२३ मे २१.०० वा. ते २१.३० वा. पूर्वी यातील पिडीत फिर्यादी हिला सन २०२२ मध्ये यातील आरोपी नामे- १) वारीस हबीब शेख, वय ३० वर्षे, रा. गोसीय मस्जिद बुट्टीबोरी ता. जि. नागपुर याने अनेक वेळा दुबे प्लाझा लॉज एम. आय. डी. सी. बटुटीबोरी येथे नेवून फिर्यादी सोबत शारिरीक संबंध केले. तेव्हा सुध्दा फिर्यादी आरोपीला तु माझे सोबत कधी लग्न करतो असे म्हणाली तेव्हा तो फिर्यादीला म्हणाला “तु मेरी तो बिबी है. मुझे थोड़ा टाइम दे” असे म्हणून फिर्यादीला टाळाटाळ करत होता. त्यानंतर सन २०२३ मध्ये दिनांक २२/४/२०२३ आरोपीने फिर्यादीला औरंगाबाद अंगुरवा माल आणण्यासाठी म्हणून नेले व तिथे तायडे लॉज येथे नेवून फिर्यादी सोबत शारिरीक संबंध केले. तेव्हा सुध्दा फिर्यादीने आरोपीला लग्नाबाबत विचारले आरोपीने काहीच उत्तर दिले नाही. त्यानंतर आरोपीने फिर्यादीला घरी आणून सोडले व त्यानंतर बुट्टीबोरी सोडून निघून गेला फोन केला तर फोन बंद करून ठेवून फिर्यादीस लग्नास टाळाटाळ करून नकार देत आहे. तरी आरोपी वारीस हबीब शेख वय ३० वर्षे रा. गोसीय मस्जीद बुट्टीबोरी ता. जि. नागपुर यांनी फिर्यादीला लग्न करतो म्हणून वारंवार जबरदस्तीने शारिरीक संबंध केले व आरोपीचा भाऊ नामे सरफराज हबीब शेख वय २८ वर्षे रा. गोसीय मस्जीद बुट्टीबोरी ता. जि. नागपुर याने फिर्यादीला तुझी बदनामी करतो म्हणून सालाई ढाच्याजवळ जबरदस्तीने शारिरीक संबंध केले. सदर प्रकरणी फिर्यादी यांच्या रिपोर्टवरून पो.स्टे. एमआयडीसी बोरी येथे आरोपीताविरुध्द कलम ३७६ (२) (एन) भा.द.वी. सहकलम ३(१) (डब्लु) (1). ३१) (डब्लु) (IIT) ३(२) (५) अ. जा. ज. अ. प्र. का. कायद्यान्वये गुन्हा नोंद केला आहे. सदर गुन्हयाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक भिमाजी पाटील पोस्टे बोरी अति चार्ज एमआयडीसी बोरी हे करीत आहे.

Email Us for News or Artical - [email protected]
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com