‘दिलखुलास’ कार्यक्रमात राष्ट्रीय पुरस्कार विजेते प्रा. सुशिल शिंदे यांची मुलाखत

मुंबई :- माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ या कार्यक्रमात राष्ट्रीय पुरस्कार विजेते सुशिल शिंदे यांची मुलाखत प्रसारित होणार आहे. या मुलाखतीचा दुसरा भाग राज्यातील आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून व ‘न्यूज ऑन एआयआर’ या ॲपवर गुरुवार दि. 6 ऑक्टोबर 2022 रोजी सकाळी 7.25 ते 7.40 यावेळेत प्रसारित होईल.

मुंबईच्या कांदिवली परिसरातील ठाकूर विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी  शिंदे यांना उत्कृष्ट कार्यक्रम अधिकारी या राष्ट्रीय पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. या निमित्ताने शिंदे यांच्या राष्ट्रीय सेवा योजनेतील योगदानाविषयी ‘दिलखुलास’ कार्यक्रमात माहिती जाणून घेतली आहे. संस्कारक्षम पिढी घडविण्यासाठी राष्ट्रीय सेवा योजना उपयुक्त ठरली असल्याचे शिंदे यांनी सांगितले. सहायक संचालक सागरकुमार कांबळे यांनी ही मुलाखत घेतली आहे

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

कझाकस्थानमध्ये आता भारतीयांना व्हिजा शिवाय प्रवेश ; मुंबई येथे वाणिज्य दूतावास सुरु करण्याबाबत विचार 

Thu Oct 6 , 2022
मुंबई :- मध्य आशियातील प्रमुख देश असलेल्या कझाकस्थानने भारतीयांकरिता व्हिसा मुक्त प्रवेश धोरण स्वीकारले असून भारतीय पर्यटकांना कझाकस्थानला १४ दिवसांपर्यंत व्हिजा शिवाय भेट देता येणार असल्याचे कझाकस्थान गणराज्याचे भारतातील राजदूत नूरलान झालगसबायेव्ह यांनी सांगितले. कझाकस्थान मुंबई येथे आपले स्वतंत्र वाणिज्य दूतावास सुरु करण्याबाबत देखील विचार करीत असल्याचे त्यांनी सांगितले. कझाकस्थानच्या राजदूतांनी मंगळवारी (दि. ४) राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची राजभवन येथे […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
Verified by MonsterInsights