पारडी नाका येथील प्रस्तावित बाजारपेठेची आयुक्तांनी केली पाहणी

नागपूर :- नागपूर महानगरपालिका आयुक्त आणि प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी गुरुवारी (२७ जून) पारडी नाका येथील प्रस्तावित प्रकल्पाच्या जागेची पाहणी केली. आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी प्रस्तावित ”भाजीपाला आणि मटण मार्केट” प्रकल्पासंदर्भात राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण व मनपाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडुन प्रस्तावित प्रकल्पासंबंधी सविस्तर आराखडा तयार करण्याचे निर्देश दिले.

पारडी नाका येथील आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांच्या पाहणी दरम्यान मनपाचे मुख्य अभियंता राजीव गायकवाड, अधीक्षक अभियंता मनोज तालेवार, उपायुक्त  मिलिंद मेश्राम, नगर रचना विभागाचे उपसंचालक प्रमोद गावंडे, सहायक आयुक्त विजय थूल, कार्यकारी अभियंता नरेश बोरकर, संजय माटे, राजीव गौतम, पंकज पराशर आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी व कर्मचारी प्रामुख्याने उपस्थित होते.नागपूर-रायपूर महामार्गवरील मौजा भांडेवाडी येथील मार्केटसाठी आरक्षित असलेली ११,८८३ चौ.मी जागेवरील ५२ भूखंडाचा ताबा ललिता डेव्हलपर्स तर्फे २०१८ मध्ये घेण्यात आला असून, जागेवर अत्याधुनिक मार्केट विकसित करण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाची नियुक्ती करण्यात आली आहे. काही कारणास्तव राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणातर्फे मार्केटचे बांधकाम करण्यात आले नाही. आता या जागेवर मनापाद्वारे मार्केट विकसित करण्याचे प्रयत्न सुरू करण्यात आले आहे.

मंजुर आराख्‌डया प्रमाणे विकसीत करावयाचे अत्याधुनिक मार्केट करीता आवश्यक जागापैकी मनपाचे नावे असलेली जागा व्यतिरिक्त राज्य शासनाच्या मालकीची जागा प्राप्त करण्याकरीता कार्यवाही पुर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले आहे. सध्या इथे मांस विक्री करण्यात येत आहे.

पाहणी दरम्यान आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी स्थानिक नागरिकांशी संवाद साधला यावेळी त्यांनी परिसरात अत्याधुनिक बाजारपेठ निर्माण करण्यात येणार असून, लवकरच विविध विभागांशीं चर्चा करून संबंधित त्रुटी दूर करण्याचे आश्वासित केले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

आपातकाल में संघ प्रमुख देवरस ने इंदिराजी को कई पत्र लिखे थे!

Fri Jun 28 , 2024
– कांग्रेस विचार जनजागृति अभियान ने किया वेरायटी चौक पर प्रदर्शन नागपुर :-भले ही आज बीजेपी और संघ आपातकाल का कितना भी दुष्प्रचार करे मगर तत्कालीन संघ प्रमुख मधुकर दत्तात्रेय देवरस ने पुना की येरवडा जेल से 1० नवंबर 1975 को पत्र लिखकर सर्वो’च न्यायालय व्दारा इंदिराजी के चुनाव की वैधता को स्वीकार करने पर बधाई दी थी. आपातकाल में […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com