संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
– जख्मि पतीला उपचारासाठी मेयो हॉस्पिटला घेऊन जाने पडले महागात
कामठी ता प्र 22 :- स्थानिक नवीन कामठी पोलीस ठाणे हद्दीतील कुंभारे कॉलनी परिसरात एका कुलूपबंद घराचे कुलूप तोडून अवैधरीत्या घरात शिरून अज्ञात आरोपीने कपाटातील सोन्या-चांदीचे 72 हजार रुपयांचे दागिने लंपास केल्याची घटना सकाळी सहा वाजता उघडकीस आली असून अज्ञात आरोपी विरोधात नवीन कामठी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे . नवीन कामठी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार नवीन निशा ताराचंद सोमकुवर वय 53 यांचे पती ताराचंद सोमकुवर हे रात्री 9 वाजता सुमारास घरी जेवण करीत बसले असताना डुकराने घरात प्रवेश करून त्यांचा उजव्या हाताच्या एका बोटाला चावा घेतल्याने बोटा लास गंभीर दुखापत झाली त्यांना उपचारासाठी कामठी उपजिल्हा रुग्णालयात घेऊन आले असता तयेथे योग्य उपचार न झाल्याने डॉक्टरांनी मेयो हॉस्पिटल नागपूर येथे उपचाराकरिता पाठविले रात्रभर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असताना आज सकाळी सहा वाजता सुमारास शेजाऱ्यांनी निशा ताराचंद सोमकुवर यांना तुझ्या घराचे कुलूप तुटले असल्याची माहिती दिली. निशा घरी परत आली असता घराचे मुख्य दाराचे कुलूप तुटलेले पडले पडून दिसून आले घरात शयन कक्षात प्रवेश केला असता शयन कक्षातील अज्ञात आरोपीने कपाट फोडून सोन्या चांदीचे दागिने ज्याची किंमत 72 हजार रुपये घेऊन पसार झाले निशा ताराचंद सोमकुवर यांनी नवीन कामठी पोलीस स्टेशनला घरफोडीची तक्रार केली असता पोलिसांनी कलम 457, 380 भावी नुसार गुन्हा दाखल करून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक शाम वारंगे करीत आहेत.निशा ताराचंद सोमकुवर यांना पतीला उपचारासाठी नागपूरला घेऊन जाणे महागात पडल्याचे दिसून येत आहे .