नागपूर :- नागपूर महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी मोरभवन (विस्तारीत) बस डेपो येथे शुक्रवारी प्रत्यक्ष पाहणी केली.
मागील 2 ते 3 दिवसापासून सतत पाऊस येत असल्याने मोरभवन (विस्तारीत) बस डेपोत पाणी साचल्याने चिखल झाले व त्यामुळे डेपोच्या जागेवरुन शहर बस संचालानास व प्रवाश्यांकरिता अडचणीचे झाले होते. तसेच डि.पी. रोडवर सुध्दा मोठया प्रमाणात पावसाचे पाणी साचलेले होते.
सदर दौऱ्यात राजीव गायकवाड मुख्य अभियंता, मनोज तालेवार अधिक्षक अभियंता, महेश धामेचा परिवहन व्यवस्थापक, राठोड कार्यकारी अभियंता (विद्यृत),श्रीकांत वाईकर ,कार्यकारी अभियंता (जलप्रदाय), विजय गुरुबक्षाणी ,कार्यकारी अभियंता धरमपेठ झोन क्र. 02, अजय डहाके कार्यकारी अभियंता (हॉट मिक्स प्लान्ट), रविन्द्र पागे प्रशासकीय अधिकारी (परिवहन), केदार मिश्रा उपअभियंता (परिवहन), योगेश लुंगे यांत्रिकी अभियंता, यासह डिम्टस् व पी. एम. आय मोबीलिटी कंपनीचे अधिकारी उपस्थित होते.
मा. आयुक्त यांनी सदर डेपोची जागेच्या समतलीकरण करण्याची कामे ही हॉट मिक्स प्लान्ट विभागामार्फत करण्याचे निर्देश दिले तसेच डी.पी. रोड ची दुरुस्ती व साचलेल्या पाण्याचा निचारा धरमपेठ झोन द्वारे करण्यात येईल. पिण्याचे पाणी ची व्यवस्था बाबतची कामे जलप्रदाय विभागामार्फत करण्यात येईल. प्रसाधनगृह उभारणे बाबतची कामे स्लम विभाग करतील तसेच डेपो परिसराची विद्युतीकरण ची कामे विद्युत विभागामार्फत करण्यात येईल. सदर जागेचा सुसंगत परिसीमन बाबतची कार्यवाही परिवहन विभागामार्फत करण्यात यावे असे निर्देश देण्यात आले.