कोरोनाशी झुंज देण्यासाठी मनपा प्रशासन पूर्णतः सज्ज

– मॉकड्रीलच्या मदतीने घेतला रुग्णालयांच्या तयारीचा आढावा 

नागपूर २७ ता : जागतिक स्तरावर कोरोनाच्या वाढत्या धोक्याच्या अनुषंगाने केंद्र शासनाकडून प्राप्त दिशानिर्देशांनुसार नागपूर महानगरपालिका कार्य करीत आहेत. मनपाद्वारे कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्यात येत असून, शासनाच्या निर्देशानुसार मंगळवार (२७ता) कोरोनावर उपचार देणाऱ्या सर्व रुग्णालयांतील तयारी तपासण्यासाठी मॉकड्रील घेण्यात आली. त्यानुसार कोरोनाशी झुंज देण्यासाठी मनपा प्रशासन पूर्णतः सज्ज असल्याचे दिसून आले.

राज्यातील सर्व शासकीय आणि खाजगी रुग्णालयांची कोविड संदर्भात पूर्वतयारी (Preparedness) संपूर्णपणे आहे की नाही, कोरोना रुग्ण संख्येचा फैलाव व कोरोना रुग्णांची संख्या अचानक वाढली तर रुग्णालयांची किती प्रमाणात तयारी आहे, या बाबतीत खातरजमा करण्यासाठी शासनाने मॉकड्रील घेण्याबाबतचे निर्देश दिले होते. त्यानुसार नागपूर महानगरपालिकेच्या हद्दीत येणाऱ्या सर्व शासकीय रुग्णालयात, मनपा रुग्णालय व खासगी रुग्णालयासह 90 पेक्षा जास्त रुग्णालयात ही मॉकड्रील घेण्यात आली.

मनपाच्या अधिकाऱ्यांनी काही रुग्णालयात भेटी देऊन रुग्णालयांच्या तयारीचा आढावा घेतला. मॉकड्रील अंतर्गत रुग्णालयातील सर्व व्यवस्थेचा आढावा घेण्यात आला. रुग्णालयातील औषधांचा आढावा मनपा अधिकाऱ्यांनी मॉकड्रील दरम्यान घेतला. याशिवाय रुग्णालयातील ऑक्सिजन प्लांट व्यवस्थित काम करत आहे की, नाही. याची पाहणी अधिकाऱ्यांनी केली. कोरोनाच्या अनुषंगाने लागणारी सर्व वैद्यकीय यंत्रे कार्यरत आहे की, नाही याची पाहणी यावेळी करण्यात आली. व्हेंटिलेटर व्यवस्थितरित्या कार्यान्वित आहे की, नाही. याची माहिती जाणून घेण्यात आली. रुग्णालयातील वॉर्डमध्ये सर्व लागणारी साधन सामग्री आहे की, नाही याचा आढावा घेण्यात आला. कोरोनाची चाचणी करण्याच्या जागी सर्व किट उपलब्ध आहेत का, प्रयोगशाळा सुसज्ज आहेत की नाही, यांची पाहणी यादरम्यान अधिकाऱ्यांनी केली.

नागरिकांनी कोव्हिड संबंधित कुठल्याही लक्षणांकडे दुर्लक्ष न करता आपली चाचणी करून घ्यावी. सुरक्षेच्या दृष्टीने नागरिकांनी गर्दीच्या ठिकाणी जाताना मास्कचा वापर करण्याचेही आवाहन मनपाद्वारे करण्यात आले आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

महिलांसाठी राखीव जागेवर केवळ महिलांचीच नियुक्ती - उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Wed Dec 28 , 2022
नागपूर : शासकीय, निमशासकीय व शासन अनुदानित संस्थांमधील सेवांमध्ये भरतीसाठी महिलांकरिता राखिव ठेवण्यात आलेल्या जागांवर केवळ महिलांनाच नियुक्ती देण्यात येईल, तसा सुधारित शासन निर्णय लवकरच निर्गमित करण्यात येईल, अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. सदस्या डॉ. भारती लव्हेकर यांनी उपस्थित केलेल्या लक्षवेधीला उत्तर देताना ते बोलत होते. दि. 25 मे 2001 रोजी निर्गमित केलेल्या शासन निर्णयात आरक्षणाची व्याप्ती, अटी […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com