मुंबई :-उत्तर मुंबईतील चारकोप मतदारसंघातील भाजपाचे उमेदवार योगेश सागर यांनी भव्य मिरवणूक काढत उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी केंद्रीय वाणिज्य मंत्री पीयूष गोयल, माजी खासदार गोपाळ शेट्टी उपस्थित होते.
——–
उत्तर मुंबईतील दहिसर मतदारसंघातील भाजपा उमेदवार मनीषा चौधरी यांनी सोमवारी अर्ज दाखल केला. यावेळी केंद्रीय वाणिज्य मंत्री पीयूष गोयल, आ.प्रवीण दरेकर, माजी खासदार गोपाळ शेट्टी आणि शिवसेनेच्या प्रवक्त्या शीतल म्हात्रे उपस्थित होत्या.
——–
भाजपा मुंबई सचिव विनोद शेलार यांनी उत्तर मुंबईतील मालाड पश्चिम मतदारसंघातून अर्ज दाखल केला. यावेळी वाणिज्य मंत्री पीयूष गोयल, माजी खासदार गोपाळ शेट्टी, योगेश वर्मा उपस्थित होते.
———
ठाणे शहर मतदारसंघात सोमवारी आ. संजय केळकर यांनी अर्ज दाखल केला. यावेळी त्यांच्या समवेत आ.निरंजन डावखरे, भाजपा शहराध्यक्ष संजय वाघुले, संदीप लेले आदी उपस्थित होते.
————
आ.संजय केळकर यांचा अर्ज दाखल करतेवेळी निघालेल्या मिरवणुकीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सहभागी झाले होते.
——–
कणकवली मतदारसंघात आ. नितेश राणे यांनी ज्येष्ठ नेते खा. नारायण राणे, सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या समवेत उमेदवारी अर्ज दाखल केला.