कौतुकाची थाप अधिक यश संपादन करण्याची ऊर्जा देते – पालकमंत्री संजय राठोड

– दारव्हा तालुक्यातील ९०० गुणंवत विद्यार्थ्यांचा गौरव

दारव्हा :- परिश्रम, जिद्द, संयम आणि सातत्य ही चतु:सूत्री विद्यार्थ्यांना यशोशिखराकडे नेते. अथक परिश्रमाने यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांच्या पाठीवर पडलेली कौतुकाची थाप त्यांना भावी आयुष्यात अधिक यश संपादन करण्याची ऊर्जा देते. विद्यार्थ्यांच्या यशाचा त्यांच्या पालकांप्रमाणेच या मतदारसंघाचा लोकप्रतिनिधी म्हणून आपल्यालाही आनंद झाला आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री संजय राठोड यांनी केले.

दारव्हा येथे शनिवारी आयोजित गुणवंत विद्यार्थ्यांच्या कौतुक सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी जीवन पाटील, शिवसेना जिल्हाप्रमुख श्रीधर मोहोड, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा कालिंदा पवार, उपविभागीय अधिकारी विजय सूर्यवंशी, उपविभागीय पोलीस अधिकारी चिलुमुला रजनीकांत, गटविकास अधिकारी राजीव शिंदे, विठ्ठल केदारे, कृउबा सभापती सुभाष राठोड, सुनीता राठोड, बबन इरवे, आरीफ काजी, प्रा. आमीन चव्हाण, शिवसेना तालुका प्रमुख मनोज सिंगी, राजू दुधे, भाऊ जाधव आदी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

यावेळी बोलताना पालकमंत्री संजय राठोड यांनी आपल्या मतदारसंघांतील विद्यार्थ्यांनी कुटुंबाचे, तालुक्याचे, राज्याचे, देशाचे नाव उज्ज्वल करावे, असे आवाहन केले. आवड असेल त्या क्षेत्रात सर्वोच्च शिखरावर पोहचावे. त्यासाठी विद्यार्थ्यांना सर्वोपरी मदत करण्याची ग्वाही दिली. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक, स्पर्धात्मक, क्रीडा, रोजगार – स्वयंरोजगार आणि आरोग्यविषयक प्रगतीसाठी आपण सातत्याने उपक्रम राबवित असून विद्यार्थ्यांनी या उपक्रमांचा फायदा घ्यावा, असे ना. संजय राठोड म्हणाले.

यावेळी दहावीतील गुणवंत विद्यार्थी अनुष्का सरागे (प्रथम), रिद्धीमा पंचोली (द्व‍ितीय), कार्तिक वाळके व अबूझर रहमान खान (तृतीय), बारावी विज्ञान शाखेतील वेदिका जाधव (प्रथम), आदेश जाधव (द्व‍ितीय), श्रावणी पचगाडे व भूमिका निमकर (तृतीय), वाणिज्य शाखेतील जीत पवार (प्रथम), सौरव फाळके (द्वितीय) आणि पायल भुसे (तृतीय) तर कला शाखेतील गायत्री भोयर (प्रथम), वैष्णवी राऊत (द्वितीय) आणि ज्ञानेश्वारी इंगोले (तृतीय) या विद्यार्थ्यांचा प्रमाणपत्र, भेटवस्तू देवून ना. संजय राठोड व इतर मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला.

यावेळी गुणवंत विद्यार्थ्यांना फेटा बांधून त्यांची वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली. या कार्यक्रमात तालुक्यातील ९०० गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. सर्व सत्कारमूर्ती विद्यार्थ्यांना स्मार्ट वॉच, कंपास, बॅग, पाण्याची बॉटल, टिफिन बॉक्स, रजिस्टर, फाईल, रेनकोट आदी साहित्य भेट देण्यात आले. युवासेना जिल्हाप्रमुख श्रीकांत टकले यांनी सुमधूर गायनाने विद्यार्थ्यांमध्ये उत्साह निर्माण केला. संचालन गणेश भोयर यांनी केले, तर आभार प्रा. किशोर राठोड यांनी मानले. कार्यक्रमास दारव्हा तालुका शिवसेना, युवासेना, महिला आघाडी, युवती सेना, चैतन्य ग्रुपचे सर्व पदाधिकारी, गुणवंत विद्यार्थी, त्यांचे पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

ARMY OPENS SITABULDI FORT ON 14 JULY 2024

Mon Jul 15 , 2024
Nagpur :- Sitabuldi Fort was opened to the Public on 14 July 2024, being the second Sunday of the month. A large number of Nagpurians visited the fort and were given an insight about the Heritage fort and the battle fought between Britishers and Marathas.     Follow us on Social Media x facebook instagram

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com