गंभीर दुखापत करणाऱ्या आरोपींना अटक

नागपूर :-फिर्यादी नामे प्रणय ज्ञानेश्वर राजुरकर, वय २० वर्षे, रा. नंदनवन झोपडपट्टी, गल्ली नं. ७. नागपुर यांचे काका नरेन्द्र राजुरकर, वय ३३ वर्ष, यांचा आरोपी क. १) सुनिल लक्ष्मण कांबळे, वय ४५ वर्षे, रा. नंदनवन झोपडपट्टी, गल्ली नं. ७. नागपूर याचे सोबत उधारीचे पैश्याचे कारणावरून वादविवाद सुरू होता, व ते जोरजोरात बोलत होते फिर्यादी हे वाद सोडविण्या करीता गेले असता, आरोपी क. १ व आरोपी क. २) तुषार सुनिल कांबळे, वय १९ वर्षे, ३) त्यांचा विधीसंघर्षग्रस्त बालक साथिदार यांनी संगणमत्त करून फिर्यादीस लाकडी राफ्टरने मारून जखमी केले, त्यांचे भांडण सोडविण्याकरीता फिर्यादीच्या काकु मदती करीता आल्या असता आरोपींनी तिघांनाही लाकडी राफ्टरने मारून गंभीर जखमी केले, जखमींचा उपचार मेडीकल हॉस्पीटल येथे करण्यात आला.

याप्रकरणी फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलीस ठाणे नंदनवन येथे पोउपनि, आडे यांनी आरोपी विरूध्द कलम ३२६, ३२४, ५०४, ३४ भा.दं.वि. अन्वये गुन्हा नोंदवुन, आरोपी क. १ व २ यांना अटक केली आहे. पुढील तपास सुरू आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

प्राणांतिक अपघात करणाऱ्या आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल

Sun Mar 17 , 2024
नागपूर :- फिर्यादीचा भाऊ नामे कबीर गणेश गवई, वय २२ वर्षे, रा. सिंगापूर सिटी अपार्टमेंट, फ्लॅट नं. १०९, बेसा, नागपुर हा त्याचे बुलेट गाडी क. एम. एच. ४९, बी.जी ४५०८ ने पोलीस ठाणे हिंगणा हद्दीतुन मोहगाव ते झिल्पी कडे जाणाऱ्या रोडने जात असताना, कोणीतरी अज्ञात वाहन चालकाने त्याचे ताब्यातील वाहन भरधाव वेगाने व निष्काळजीपणे चालवुन फिर्यादीचे भावाचे बुलेट गाडीला धडक […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
Verified by MonsterInsights