कर्मवीर दादासाहेब कुंभारे जन्मशताब्दीनिमित्त ड्रॅगन पॅलेस टेम्पल येथे पूज्य भिक्कु संघाच्या उपस्थितीत विशेष बुद्ध वंदना व धम्मदेसना संपन्न

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

– नलिनी कुंभारे यांच्या शुभ हस्ते ऍड सुलेखा कुंभारे यांच्या प्रमुख उपस्थीतीत पूज्य भिक्कु संघास भोजनदान व संघदान

– कर्मवीर ऍड. दादासाहेब कुंभारे यांचे धम्मकार्यात महत्वपुर्ण योगदान – पूज्य भन्तेजी राहुलबोधी महाथेरो मुंबई

कामठी :- कर्मवीर ऍड.  दादासाहेब कुंभारे यांचे संपूर्ण जीवन समाजासाठी विशेषता बिडी कामगारा करिता समर्पित होते. समाज कार्यासोबत धम्मकार्यामध्ये त्यांनी महत्वपूर्ण भूमिका बजावली.नागपूर येथील धम्मदीक्षा समारंभास परमपूज्य डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्यक्रमात एक धम्मसेवक म्हणून अथक परिश्रम घेतले.पुढे जाऊन दादासाहेब कुंभारे हे दीक्षाभूमी स्मारक समितीचे कार्याध्यक्ष झाले तसेच नागपूर येथील परमपूज्य डॉ बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयाच्या निर्मितीकरिता सुदधा त्यांनी पुढाकार घेतला. दादासाहेब कुंभारे यांच्या सोबतच धम्मकार्यात आयुष्यमती नलिनी कुंभारे यांचे सुद्धा अमूल्य योगदान आहे असे मत ऑल इंडिया भिकू संघाचे उपसंघनायक मुंबई पूज्य भन्ते राहुलबोधी महाथेरो यांनी मांडले.

कर्मवीर दादासाहेब कुंभारे जन्मशताब्दी निमित्त विश्वविख्यात ड्रॅगन पॅलेस टेम्पल येथे पूज्य भिक्कु संघाच्या उपस्थितीत विशेष बुद्ध वंदना व धम्मदेसनाचे आज 23 मार्च ला सकाळी 10.30 वाजता आयोजन करण्यात आले होते.याप्रसंगी ऑल इंडिया भिक्कु संघाचे उपसंघनायक पूज्य भन्तेजी राहुलबोधी महाथेरो ,पूज्य भन्तेजी सत्यशील महाथेरो,पूज्य भन्ते नागदीपंकर,पूज्य भन्तेजी मेत्तानंद,पूज्य भन्तेजी नंदिता,पूज्य भन्तेजी ज्योतिबोधी,पूज्य भिक्कु संघ,व भिक्कूनी संघाच्या उपस्थितीत विशेष बुद्धवंदना व धम्मदेसना घेण्यात आली.

तत्पूर्वी कर्मवीर दादासाहेब कुंभारे यांच्या प्रतिमेला ऍड. सुलेखा कुंभारे यांच्या हस्ते माल्यार्पन करून अभिवादन वाहण्यात आले.त्यानंतर पूज्य भिक्कु संघांनी विशेष बुद्ध वंदना घेऊन उपस्थित उपासक उपसिकांना धम्मदेसना दिली.याप्रसंगी नलिनि कुंभारे यांच्या शुभ हस्ते पूज्य भिक्कु संघ व भिक्कूनी संघाला भोजनदान व संघदान देण्यात आले.

याप्रसंगी ओगावा सोसायटी,विश्वविख्यात ड्रॅगन पॅलेस टेम्पल,डॉ बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक व संशोधन केंद्र,ड्रॅगन मेडिटेशन सेंटर,हरदास शैक्षणिक व सांस्कृतिक संस्था,दादासाहेब कुंभारे बहुउद्देशीय प्रशिक्षण संस्था,हरदास विद्यालय,ड्रॅगन इंटरनॅशनल स्कुल,दादासाहेब कुंभारे विद्यालय नेरी,ओगावा इंटरप्रायझेस प्रायवेट लिमिटेड,जयभारत कामगार सहकारी संस्था,महाराष्ट्र राज्य बिडी उत्पादक मजदूर संघ, दादासाहेब कुंभारे बिडी उत्पादक मजदूर सहकारी संस्था, बहुजन रिपब्लिकन एकता मंच,निर्धार महिला व बालविकास समिती यासह इत्यादी संस्थेच्या वतीने कर्मवीर ऍड. दादासाहेब कुंभारे यांच्या प्रतिमेवर पुष्प अर्पण करून अभिवादन वाहण्यात आले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

लाचखोर तांत्रिक अभियंता गजाआड ; २००००/- रुपये स्विकारतांना अटक...

Thu Mar 23 , 2023
नगर परिषद सावनेर कार्यालयात कार्यरत असलले तांत्रिक अभियंत्यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने आज रंगेहात पकडले. सावनेर – सावनेर नगर परिषद कार्यालयात एका महिन्याच्या आत २ शासकीय लाचखोर अधिकारी तसेच त्यांचे  २ खाजगी व्यक्तींना अटक करण्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे सापळे यशस्वी झाले आहे. नगर परिषद कार्यालय, सावनेर येथील तांत्रिक अभियंता नितीन विनायकराव मदनकर, वय 41 वर्ष , पद – शहर स्तरीय […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com