संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- धम्मचक्र प्रवर्तन दिन ,अशोक विजयादशमी सोहळा तसेच वर्षावास समाप्तीचे निमित्त साधून दीक्षाभूमी दक्षता समिती च्या वतीने आज 24 ऑक्टोबरला सकाळी 11 वाजता कामठी शहरात काढण्यात आलेल्या 125 फूट लांबीच्या पंचशिल धम्म ध्वज यात्रेत हजारोच्या वरील संख्येतील अनुयायांनी सहभाग नोंदवून जयभीम च्या घोषणेने संपूर्ण कामठी शहर दुमदुमून टाकले तर ही 125 फूट लांबीची पंचशील धम्म ध्वज यात्राने कामठीकरांचे लक्ष वेधले.
या पंचशिल धम्म ध्वज यात्रेची सुरुवात नया नगर कामठी येथील धम्मदीप संघ बौद्ध विहार येथे सामूहिक बौद्ध वंदना घेऊन करण्यात आली .ही धम्म ध्वज यात्रा नयानगर, खलाशी लाईन, मोदी पडाव, चन्द्रमनी नगर, मेन रोड ,मोटर स्टॅन्ड चौक ,हैदरी चौक, हरदास नगर ,जयस्तंभ चौक, हॉकी बिल्डिंग चौक, जय भीम चौक, कामगार नगर, रमा नगर ,गवळीपुरा नगर भ्रमण करीत या 125 फुट लांब धम्म ध्वज यात्रेचा जयस्तंभ चौकातील भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ समापन करण्यात आले.या पंचशील धम्म ध्वज यात्रेच्या यशस्वीतेसाठी दीक्षाभूमी दक्षता समिती,कामठी महिला संघ,संविधान दिन गौरव समिती कामठी,बू-शिंदो कराटे असोसिएशन कामठी, कामठी नगर विकास कामठी च्या समस्त पदाधिकारी व सदस्यांनी मोलाची धम्मसेवा पुरविली.