खासदार क्रीडा महोत्सव कार्यालयाचे उद्घाटन शनिवारी

– पॅरा-बॅडमिंटन विश्व चॅम्पियन खेळाडू मानसी जोशी यांची प्रमुख उपस्थिती

नागपूर :- केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पेतून नागपूर शहरात लवकरच सातव्या खासदार क्रीडा महोत्सवाचे आयोजन होणार आहे. या अनुषंगाने शनिवारी २१ डिसेंबर २०२४ रोजी खासदार क्रीडा महोत्सवाच्या कार्यालयाचे उद्घाटन पॅरा बॅडमिंटन विश्व चॅम्पियन मानसी जोशी यांच्या हस्ते होणार आहे.

शनिवारी (ता.२१) सायंकाळी ५.३० वाजता सीताबर्डी येथील ग्लोकल स्क्वेअर मॉलमधील कार्यालयाचे उद्घाटन होईल. उद्घाटन सोहळ्याला प्रमुख अतिथी म्हणून भारतीय जनता पार्टीचे नागपूर शहराध्यक्ष जितेंद्र (बंटी) कुकडे, आमदार कृष्णा खोपडे, आमदार मोहन मते, आमदार प्रवीण दटके यांची उपस्थिती असेल.

नागपूर शहर आणि संपूर्ण नागपूर जिल्ह्यासोबतच विदर्भातील खेळाडूंसाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून साकारलेले खासदार क्रीडा महोत्सव हे पर्वणी ठरत आहे. या क्रीडा महोत्सवाच्या माध्यमातून अनेक खेळाडूंना मोठे व्यासपीठ उपलब्ध झाले आहे. या महोत्सवाच्या सातव्या पर्वाला नव्या वर्षात सुरूवात होणार आहे. त्याअनुषंगाने खासदार क्रीडा महोत्सवाच्या कार्यालयाचा शुभारंभ करण्यात येत आहे. या कार्यक्रमाला शहरातील खेळाडू, क्रीडाप्रेमी आणि नागरिकांनी मोठ्या संख्येत उपस्थित रहावे, असे आवाहन खासदार क्रीडा महोत्सव आयोजन समितीद्वारे करण्यात आले आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

‘दिलखुलास’ कार्यक्रमात 'राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त' अध्यक्ष न्या. सुरेंद्र तावडे व कार्याध्यक्ष शिरीष देशपांडे यांची मुलाखत

Fri Dec 20 , 2024
मुंबई :- माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ या कार्यक्रमात ‘राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त’ राज्य ग्राहक तक्रार निवारण आयोगाचे अध्यक्ष, न्या. सुरेंद्र तावडे तसेच मुंबई ग्राहक पंचायतीचे कार्याध्यक्ष शिरीष देशपांडे यांची विशेष मुलाखत प्रसारित होणार आहे. ही मुलाखत आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून तसेच ‘न्यूज ऑन एआयआर’ या ॲपवरून सोमवार दि. 23, मंगळवार दि. 24, बुधवार दि. 25 आणि गुरुवार दि.26 डिसेंबर 2024 […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!