– लीज नूतनीकरण न झाल्याने जमीन मालकाची कार्यवाही!
– बीपीसील चे अधिकाऱ्यांची खुलासा करण्यास टाळाटाळ!
– 59 पम्प कर्मचारी च्या नौकऱ्याचा गंभीर प्रश्नन!
– बीपीसील चे जॉन्सन नामक अधिकारी “नोट रीचेबल”
वाडी :- वाडी परिसरसतील दाभा वळणाजवल असलेले भारत पेट्रोलियम कम्पनी द्वारे संचालीत पेट्रोल पंप ला मंगळवारी दुपारी अचानक लोखंडी कठडे लावून बंद करण्यात आल्याने पेट्रोल विक्री बंद झाली तर सर्व कर्मचारी एकत्र येऊन चिंताग्रस्त होऊन काही निर्णयाची वाट बघत उभे होते तर पेट्रोल भरणाऱ्या असंख्य ग्राहकांना परत जावे लागले.
या संदर्भात वाडी च्या प्रसार माध्यम प्रतिनिधींना माहिती मिळताच त्यांनी घटना स्थळ गाठले. सर्व प्रथम पट्रोल पम्प बंद व विक्री बंद बाबत त्यांनी बीपीसील चे विक्री अधिकारी जॉन्सन याच्या कडे सम्पर्क करून या बाबीची कारणे व स्थिती विचारली असता त्यांनी फक्त विषय ऐकला व आवाज बरोबर येत नसल्याचे कारण सांगून फोन बंद केला त्या नंतर त्यांना अनेकदा सम्पर्क करून ही त्यांनी फोन स्वीकारला नाही.त्या नंतर प्रस्तुत प्रतिनिधी नि नागपूर ग्रा. तहसील चे तहसिलदार आशिष वानखेडे यांनी या बाबीची कल्पना देण्यासाठी सम्पर्क साधला असता त्यांनी ग्रा.प सोडत कार्यक्रमात कार्य मग्न असल्याचे सांगितले मात्र समस्या समजून घेऊन योग्य कार्यवाही चे सुचित केले.
त्या मुळे या पंपाला लोखंडी कठडे लावून बंद करणारे पम्प जागेचे मूळ मालक प्रमोद अग्रवाल यांना या संदर्भात विचारणा केली असता त्यांनी सांगितले की बीपीसील या तेल कम्पनी सोबतचा 1961 ला केलेला लेखी करार 31/12/2022 ला सम्पला.व त्यांनी कंपनीला नवीन अटी व शर्थी वरील करार प्रस्ताव सादर केला.मात्र कम्पनी ने त्यावर अजूनही कार्यवाही केली नाही.मागील 8 दिवसापासून त्यांना सतत आठवण देऊन नूतनीकरण करण्यासाठी विनंती करीत असूनही टोलवाटोलवीची उत्तरे देत आहे.त्या मुळे त्यांना पुढे नूतनीकरण करायचे नाही हे स्पष्ट होत असल्याने आज मी माझी जागा ताब्यात घेतली आहे.
या संदर्भात आत मध्ये उपस्थित कम्पनीचे कंत्राटदार मुखर्जी यांना विचारले असता या वाद कम्पनी व जमीन मालक यांच्यातील असून बैठक व करार न झाल्याने ही स्थिती उदभवली आहे.जमीन मालकाने जो नवीन करार कँपणीला प्रस्तुत केला ते कंपनीला परवडण्यासारखे नसल्याचे समजते.मासिक आवक कमी तर 59 कर्मचाऱ्यांचे वेतन व सुविधा यांचा ताळमेळ जुळून येत नाही.काही कर्मचारी सँख्या कमी करून,व मालकाने करारातील दिलेली वार्षिक शुल्क काही कमी करावे व पंप सुरू करून कर्मचाऱ्यांच्या नौकऱ्या वाचविणे चर्चेतून दिसून आले.बीपीसील ने योग्य करार करावा अन्यथा पंप व आपले कर्मचारी अन्यत्र नेऊन पंप सुरू करावा असे जागा मालक अग्रवाल यांचे म्हणणे आहे.स्थिती लक्षात घेता बीपीसीएल चे जॉन्सन नामक अधिकारी घटनास्थळी येऊन जमीन मालकाचे व कर्मचाऱ्यांचे समाधान करणे आवश्यक होते मात्र ते उशिरा पर्यँत इकडे भटकलेच नाही.या चर्चे दरम्यान असेही समजले की कम्पनी चा जागेचा करार डिसेंम्बर 22 ला व लायसन्स ची मुदती ही सम्पली असूनही कँपणीने या पंपाला नियमबाह्य पध्दतीने 4 महिने पेट्रोल चा पुरवठा कसा केला? या बाबीचीही चौकशी होणे गरजेचे आहे.हा पेट्रोल पम्प कुण्या सैन्य अधिकाऱ्यालाया संचलित करण्यासाठी कम्पनी कडून वितरित झाला असल्याचे समजते.त्या मुळे नवीन वितरक,जुने 59 कर्मचारी,जमीन विवाद यावर कंपनीने वेळेत मार्ग न काढल्याने ही स्थिती ओढवल्याचे चर्चेत दिसून आले.या ऐकून स्थिती मुळे येथे कार्यरत कर्मचारी नौकरी जाण्याच्या भीतीने चिंताग्रस्त झाले असून अधिकारी,जिल्हाधिकारी,जागा मालक यांनी संयुक्त बैठक करून दिलासा द्यावा अशी मागणी या कर्मचाऱ्यांनी केली आहे. मार्ग न निघाल्यास उद्या पासून धरणे आंदोलन करण्या शिवाय पर्याय नसल्याचेही मत या कर्मचार्यांनी व्यक्त केले आहे.बीपीसीएल कंपनी ने या संदर्भात आपली कोणतीही बाजू प्रस्तुत न केल्याने मत घेता आले नाही.
@ फाईल फोटो