विधान परिषदेच्या दहा सदस्यांना निरोप निवृत्त होणाऱ्या सदस्यांना निरोगी व दीर्घायुष्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्या शुभेच्छा

 मुंबई –   महाराष्ट्र विधान परिषदेतून दहा सदस्य लवकरच निवृत्त होत असून या सर्व सदस्यांना निरोगी व दीर्घायुष्यासाठी  उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या शुभेच्छा व्यक्त केल्या.

            विधानपरिषदेतून सभापती रामराजे नाईक-निंबाळकरविरोधी पक्षनेते प्रवीण दरेकरउद्योगमंत्री सुभाष देसाई,       सदस्य सर्वश्री  दिवाकर रावतेसदाशिव खोतसुजितसिंह ठाकूरविनायक मेटेप्रसाद लाडसंजय दौंडरवींद्र फाटक हे दहा सदस्य निवृत होणार आहेत. या सदस्यांना सभागृहात निरोप देण्यात आला. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सर्व दहा सदस्यांच्या कारकीर्दीविषयी व त्यांच्या सभागृहातील कामगिरीविषयी आपले विचार व्यक्त केले.

            सभापती रामराजे नाईक निंबाळकर हे महाराष्ट्राच्या राजकारणातलं अभ्यासूसुसंस्कृतउच्चशिक्षित व्यक्तिमत्वं म्हणून ओळखले जाते. फलटण राजघराण्याचे २९ वे वंशज म्हणूनही त्यांचं जनमानसात वेगळे स्थान आहे. प्राध्यापकफलटणचे नगराध्यक्षविधीमंडळाच्या दोन्ही सभागृहांचे आमदारराज्याचे मंत्रीविधान परिषदचे सभापती अशा जबाबदाऱ्या त्यांनी  यशस्वीपणे  सांभाळल्या आहेत. त्यांनी  त्यांच्या कार्यातून विधिमंडळ सभागृहाची उंची वाढवण्यासाठी योगदान दिले आहे. त्यांच्यासोबतच्या अनेक आठवणी उपस्थित सदस्यांच्या मनात कायम राहतीलअसे उपमुख्यमंत्री म्हणाले.

            विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी सभागृहात निश्चितच चांगलं काम केले आहे.  ते सहकारी बँकिंग क्षेत्रातून पुढं आलेलं  नेतृत्व असल्याचे उपमुख्यमंत्री म्हणाले.

            उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी महाराष्ट्रासारख्या औद्योगिकव्यापारीआर्थिकदृष्ट्या प्रगत राज्याचे उद्योगमंत्री म्हणून काम करतानाया राज्यात औद्योगिक गुंतवणूक वाढावीउद्योगधंद्यांचा विकास व्हावाउद्योगांसाठी पोषक वातावरण निर्माण व्हावेयासाठी त्यांनी केलेले कार्य कौतुकास्पद असल्याचे उपमुख्यमंत्री म्हणाले.

            सदस्य दिवाकर रावते यांनी मराठी भाषेसाठी आणि मराठी बांधवांच्या हक्काच्या लढ्याचा वसा आणि वारसा  पुढे नेला आहे.  या सभागृहातली त्यांची भाषणे,  विचार पुढे नेणारी होतीअसे उपमुख्यमंत्री म्हणाले.

            सदाभाऊ खोत हे शेतकरी संघटनेच्या चळवळीतून पुढे आलेले नेतृत्व आहे. शेतकरी संघटनेचे नेतेदिवंगत शरद जोशी यांच्या नेतृत्वाखाली सदाभाऊंनी चळवळीच्या कामाला सुरुवात केली.  सांगली जिल्ह्यातल्या वाळवा तालुक्यातल्या मरळनाथपूर सारख्या छोट्याशा गावातलासामान्य शेतकऱ्याच्या घरी जन्‍मलेला युवक या सभागृहाचा सदस्य होतोराज्याच्या मंत्रीमंडळात काम करतोही मोठी गोष्ट असल्याचे उपमुख्यमंत्री म्हणाले.

            सुजितसिंह ठाकूर हे विधीमंडळात मराठवाड्याचं प्रतिनिधीत्वं करतात. त्यांनी राजकीयसामाजिक जीवनाची सुरुवातपरांड्यांतून केली. राजकारणसमाजकारणसहकाराच्या बरोबरीनं शिक्षण क्षेत्रात योगदान दिलं. त्यांच्या तिथल्या ज्ञानाचाअनुभवाचा उपयोग त्यांना सभागृहात निश्चितपणे झाला.

            विनायक मेटे यांचे संघटन कौशल्य चांगलं आहे. त्यांच्याकडे वक्तृत्वंवकूब आहे. त्यांच्या या गुणांचा फायदा समाजाला झाला पाहिजे. त्यासाठी त्यांना शुभेच्छा देत असल्याचे उपमुख्यमंत्री म्हणाले.

            सदस्य प्रसाद लाड हे   राजकारणसमाजकारणउद्योगसेवा अशा अनेक क्षेत्रात एकाच वेळी काम करणारं नेतृत्व आहे. राज्यातल्या एका उद्योगशील प्रतिनिधीला या सभागृहाच्या माध्यमातून आपण निरोप देत असल्याची भावना आपल्या सगळ्यांच्या मनात असल्याचे उपमुख्यमंत्री म्हणाले.

             बीड जिल्ह्यातल्या परळी तालुक्यात जन्मलेल्या आमदार संजय दौंड यांना त्यांचे वडील माजी मंत्री पंडीतराव दौंड यांचा राजकीयसामाजिक वारसा लाभला आहे. तो वारसा ते समर्थपणे पुढे चालवत आहेत. बीड जिल्हा परिषद सदस्य म्हणून संजय दौंड यांचा राजकीय प्रवास सुरु झाला. स्थानिक स्वराज्य संस्थेत प्रदीर्घ काळ काम केल्यामुळं त्यांना जनतेच्या प्रश्नाची चांगली जाण आहे. त्याचा उपयोग त्यांना या सभागृहात झाला असल्याचे उपमुख्यमंत्री म्हणाले.

             रविंद्र फाटक हे संकल्प प्रतिष्ठानच्या माध्यमातून राजकीयसामाजिकसांस्कृतिक क्षेत्रात काम करतात. त्यांनाही शुभेच्छा देत असल्याचे उपमुख्यमंत्री म्हणाले.

            दरम्यान,  यावेळी सभापती रामराजे नाईक-निंबाळकरउपसभापती नीलम गोऱ्हेपरिवहन मंत्री अनिल परबसदस्य सुरेश धसदिवाकर रावतेविनायक मेटेभाई गिरकरसदाशिव खोतनिलय नाईक यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

शैक्षणिक संस्थांमध्ये सुरक्षाविषयक माहिती फलक लावावेत - डॉ. नीलम गोऱ्हे

Thu Mar 24 , 2022
महिला सुरक्षेला प्राधान्यक्रम देण्याच्या सूचना               मुंबई : ‘राज्यात शाळा आणि महाविद्यालयांमध्ये गेल्या वर्षभराच्या काळात एकतर्फी प्रेमातून हल्ले झाल्याच्या काही घटना घडल्या होत्या. त्यांचा तपास आणि पोलिसांकडून काय कार्यवाही करण्यात आली याबाबतचा अहवाल सादर करा. सुरक्षाविषयक नियम आणि तक्रार कुठे करायची याबाबत योग्य ती यंत्रणा तयार करून कार्यान्वित करावी. शाळांमध्ये असलेल्या व्यावसायिक समाजकार्य शिक्षण घेतलेल्या कर्मचाऱ्यांना विद्यार्थी समुपदेशनात सहभागी करून घ्या. पोलीस […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!