केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते दिव्यांग बांधवांना ई-रिक्षा वितरित, नागपुर स्मार्ट सिटी व नागपूर महानगरपालिकेचा पुढाकार

नागपूर :- नागपूर स्मार्ट अँड सस्टेनेबल सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लि. आणि नागपूर महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने शहरातील दिव्यांग बांधवांच्या सक्षमीकरणाच्या दृष्टीने त्यांना ई-रिक्षा वितरीत करण्यात आल्या. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी लाभार्थी दिव्यांग बांधवांना ई-रिक्षाची चावी सुपूर्द केली.शुक्रवारी (ता. २६) पारडी येथील भवानी माता मंदिर परिसरात आयोजित कार्यक्रमात पूर्व नागपूरचे आमदार कृष्णा खोपडे, आमदार विकास कुंभारे, नागपूर स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजय गुल्हाने, सी ए. आशिष मुकीम, मनपाचे उपायुक्त प्रकाश वराडे, स्मार्ट सिटीचे महाव्यवस्थापक  राजेश दुफारे, खालसा इव्ही प्रायव्हेट लिमिटेड मुझफ्फरनरचे व्यवस्थापकीय संचालक शिवम नारंग, उपाध्यक्ष कमलदीप सिंग, माजी नगरसेवक मनीषा धावडे प्रदीप पोहाने, दीपक वाडीभस्मे, प्रमोद पेंडके, कांता रारोकर, देवेंद्र मेहर, मनिषा चाकोले, मनिषा वैद्य, चेतना टांक, भवानी माता मंदिराचे पांडुरंग मेहर यांची विशेष उपस्थिती होती.याप्रसंगी मार्गदर्शन करताना नितीन गडकरी म्हणाले की, पूर्व नागपूरचे आमदार कृष्णा खोपडे आणि नागपूर स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजय गुल्हाने यांच्या पुढाकारातून दिव्यांग बांधवांना ई रिक्षा मिळणे ही आनंदाची बाब आहे. यामुळे दिव्यांग बांधवांना सन्मानाचा मार्ग मिळाला असून यामुळे ते आत्मनिर्भर होतील, असा विश्वास केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केला. याशिवाय ई रिक्षामुळे दिव्यांग बांधवांना रोजगार मिळाला आहे. ई रिक्षा हे पर्यावरणपूरक वाहतूक व्यवस्थेच्या दृष्टीने महत्वाचे पाऊल असून ईरिक्षा खरेदी करिता कर्ज देखील उपलब्ध होणे आवश्यक आहे, असे ना. गडकरी म्हणाले. दिव्यांगांच्या सर्वांगिण सक्षमीकरण आणि उत्थानासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत. त्यांनी सांगितले की पूर्व नागपूरच्या पारडी पुलाचे उद्घाटन लवकर केले जाईल. तसेच दिव्यांगांच्या क्रीडा विकासासाठी विशेष स्टेडियम तयार करण्याचा मानस देखील यावेळी नितीन गडकरी यांनी यावेळी व्यक्त केला. गडकरी यांच्या मार्गदर्शनखाली नागपूर स्मार्ट सिटी च्या माध्यमातून पूर्व नागपूरचा अत्याधुनिक विकास होत असल्याचा विश्वास पूर्व नागपूरचे आमदार कृष्णा खोपडे यांनी व्यक्त केला.

ई-रिक्षा प्राप्त लाभार्थी

गुलाम मोहिउद्दीन अंसारी, प्रवीण शेगोकर, रोशन गोडबोले, प्रशांत पराते, उत्तम वाघमारे, शेख शकील शेर मोहम्मद, किशोर चावरे, धनराज चव्हाण, सफीया सुलताना हमीदउल्लाह, राम हेडाउ, शेख सलीम हाजी शेख अब्बास, राधेश्याम डाहे, राकेश धुर्वे, महेंद्र गायकवाड, नीलेश गजभिये.

स्मार्ट सिटी प्रकल्पबाधितांना नवीन भूखंड वाटप

नागपूर स्मार्ट सिटी प्रकल्प अंतर्गत क्षेत्राधिष्ठीत विकास या घटकाखाली मौजा पारडी, भरतवाडा, पूनापूर व भांडेवाडी येथील १७३० एकर क्षेत्रासाठी प्रारुप नगर रचना परियोजना तयार करण्यात आली असून त्यास शासनाची मंजूरी प्राप्त आहे. या परियोजने अंतर्गत ९, १२, १५, १८, २४ आणि ३० मीटर रुंदीचे असे एकूण ५० कि.मी. लांबीचे विविध मुख्य रस्ते प्रस्तावित आहेत. प्रस्तावित मुख्य रस्त्यांची विकास कामे नागपूर स्मार्ट अँड सस्टेनेबल सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लि. मार्फत करण्यात येत आहेत. सदर परीयोजनेअंतर्गत MC-६१ या रस्त्याचे बांधकाम पूर्ण करण्यात आले आहे. या रस्त्यांतर्गत ज्या प्रकल्प बाधितांचे संपूर्ण भूखंड संपादित करण्यात आले त्या प्रकल्पबाधितांना टांकवाडी येथे अभिन्यासामध्ये पुनर्वसनांतर्गत नवीन भूखंड वाटप करण्यात आले.

पंकज भजे, प्रभाकर धार्मिक, मंगेश आतीलकर, लीलाबाई ठाकूर, शेरसिंह बघेल, सतीश बगमारे या प्रकल्पबाधितांना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते भूखंडाचे कागदपत्र प्रदान करण्यात आले. तसेच लोकहितार्थ उपरोक्त प्रकल्प बाधितांच्या पुनर्वसनासाठी अभिन्यासाखालील जमिनीचा (३६७ फुट) ताबा प्रितेश टांक यांनी नागपूर स्मार्ट अँड सस्टेनेबल सिटी डेव्हलपमेंट कार्पोरेशन लिमिटेड ला विनामोबदला दिल्याबद्दल त्यांचा यावेळी मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.कार्यक्रमाचे संचालन जनसंपर्क अधिकारी मनीष सोनी यांनी केले. यावेळी स्मार्ट सिटीच्या नेहा झा, डॉ प्रणिता उमरेडकर, डॉ शील घुले, राहुल पांडे, मोईन हसन आदी उपस्थित होते.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

रोजगार हमीच्या योजना मोठ्या प्रमाणात राबवून अड़ेगाव(पटाचा )समृद्धिच्या मार्गावर - सरपंच जोगेंद्र वसनिक

Sat May 27 , 2023
कोदामेंढी :- येथून जवळच असलेल्या गट ग्रा. पं. अंतर्गत अड़ेगाव व कथालाबोड़ी या दोन गावांचा समावेश आहे. शासनाने प्रत्येक गावाला समृद्ध करन्यासाठी महात्मा गाँधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेत अनेक नविन कामाँचा समावेश केला आहे. मात्र योजनेच्या जाचक अटी पाहता, मौदा तालुक्यातील अनेक गावात फारच कमी कामे सुरु आहेत, तर कुठे संपूर्ण बंद पडलेले आहेत. मात्र याला अपवाद वगळता तालुक्यातील […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com