संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- सहाय्यक निबंधक सहकारी संस्था कामठी च्या कार्यालयात काल पार पडलेल्या कामठी तालुक्यातील टेमसना,शिवणी,व परसाड सेवा सहकारी संस्था च्या अध्यक्ष उपाध्यक्ष पदाची निवडणूक ही बिनविरोध पार पडली.
ही निवडणूक माजी मंत्री सुनील केदार व माजी जी प अध्यक्ष सुरेश भोयर यांच्या कुशल नेतृत्वात कामठी कृषी उत्तपन्न बाजार समितीचे सभापती अनिकेत शहाणे व उपसभापती कुणाल इटकेलवार यांच्या मार्गदर्शनात अविरोध पार पडली.
अविरोध पार पडलेल्या निवडणूक निकालानुसार टेमसना सेवा सहकारी संस्थेच्या अध्यक्षपदी अशोक राऊत तर उपाध्यक्षपदी गुलाबराव नागपूरे तसेच परसाड सेवा सहकारी संस्थेच्या अध्यक्षपदी नानाजी झाडे व उपाध्यक्षपदी गुनवंता बघेले तसेच शिवणी सेवा सहकारी संस्थेच्या अध्यक्षपदी महादेव कोरडे तर उपाध्यक्ष पदी रमेश गोमेकर यांची अविरोध निवड करण्यात आली.
याप्रसंगी कामठी पंचायत समिती सदस्य सोनु कुथे,मनोज कुथे,अशोक शहाणे,विनायक ठाकरे,हिरामण वाघ, अशोक राऊत,दुर्योधन गोतमारे,अरविंद शहाणे,सुरेश शहाणे,रंजना ढवळे,सुनिता शहाणे, उमेश वडे,अनिल नितनवरे,गोपीचंद आभोरे,भगवान कोरडे,अशोक वानखेडे,युवराज गोमेकर, एकनाथ ढोमने,गोविंदा आखरे,कृष्णा चौधरी, मैना घोडमारे, कौसल्या श्रीरामे,ज्ञानेश्वर माणेमुळघे,नामदेव श्रीरामे,संभाजी मानमोडे,गजानन चिंचपुरे,राजेंद्र मानमोडे,डोमा धांडे,केवलराम राऊत,संपत टाले,गीता घरझाडे,तुषार उघडे,मधुकर पाटील व इतर उपस्थित होते.