-नागरिकांनी जागृत राहून वस्तू खरेदी करावे – उपविभागीय अधिकारी वंदना सवरंगपते यांचे नागरीकांना आवाहन..
रामटेक :- राष्ट्रिय ग्राहक दीन हा दरवर्षी २४ डिसेंबर रोजी भारतात साजरा केला जातो .२४ डिसेंबर १९८६ ला या दिवशी ग्राहक हक्क कायद्याला भारताच्या राष्ट्रपतींनी मंजुरी दिली होती. तहसील कार्यालय रामटेक येथे उपविभागीय अधिकारी वंदना सवरंगपते यांच्या अध्यक्षतेखाली , पुरवठा विभागाच्या वतीने राष्ट्रीय ग्राहक दीन साजरा करण्यात आला.अध्यक्षीय भाषणात
उपविभागीय अधिकारी वंदना सवरंगपते यांनी
ग्राहक तुमचे हक्क जाऊन घ्या या , जसे की एखादी वस्तू घेतला त्या वस्तूची उत्पादन तारीख , एक्सपायरी डेट बघणे , एखादी वेळेस ग्राहकाची फसवणूक तर त्याची तक्रार करण्याचा अधिकार तसेच ग्राहकांनी जागृत राहून वस्तू घेण्याचे आवाहन केले. तहसीलदार बाळासाहेब मस्के यांनी ग्राहकांनी एखादी वस्तू घेताना आपले कोणते अधिकार आणि हक्क आहेत सोबतच ऑनलाईन खरेदी वरही मार्गदर्शन केले.
यावेळी उपविभागीय अधिकारी वंदना सवरंगपते , तहसिलदार बाळासाहेब मस्के , नगर परिषद रामटेक चे नगराध्यक्ष दिलीप देशमुख , निरीक्षण अधिकारी स्वप्नील पडोळे ,पुरवठा निरीक्षक नागार्जुन खोरे , पुरवठा निरीक्षक आतिश जाधव ,
अखिल भारतीय ग्राहक पंचायत चे उपाध्यक्ष अविनाश शेंडे,
अखिल भारतीय ग्राहक पंचायत शाखा रामटेकच्या पदाधिकारी शितल चिंचोळकर ,तसेच
स्वस्त धान्य दुकानदार , व नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाची प्रस्तावना , सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन पुरवठा निरीक्षक आतिश जाधव यांनी केले.