शहराच्या विकासासाठी निधी कमी पडु देणार नाही – पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार

विविध स्पर्धांचा बक्षीस वितरण सोहळा

योग नृत्य परिवार आझाद गार्डन संघास प्रथम बक्षीस – १ लक्ष, ट्रॉफी व वार्डासाठी २५ लक्ष रुपयांची विकास व सौंदर्यीकरणाची कामे

चंद्रपुर  :- चंद्रपूर महानगरपालिकेमार्फत घेण्यात आलेल्या वार्ड स्वच्छता – सौंदर्यीकरण व राज्यस्तरीय भिंतीचित्र स्पर्धेत शहर स्वच्छता, सौंदर्यीकरणाचे काम प्रशासन तसेच लोक सहभागाद्वारे पार पडले असुन स्पर्धेच्या माध्यमातुन होणाऱ्या शहर विकास कामांसाठी निधी कमी पडु देणार नसल्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले.

चंद्रपूर मनपा मार्फत वार्ड स्वच्छता व सौंदर्यीकरण, राज्यस्तरीय भिंतीचित्र स्पर्धा,व इतर स्पर्धांच्या बक्षीस वितरणाचा कार्यक्रम राज्याचे वन, सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार व आमदार किशोर जोरगेवार यांच्या हस्ते दि.१० फेब्रुवारी रोजी मनपा इमारत प्रांगणात पार पडला.

याप्रसंगी बोलतांना पालकमंत्री म्हणाले की, आपले शहर हे कुण्या एकट्या व्यक्तीचे नाही तर सर्वांचे आहे. कुठलाच उपक्रम लोकसहभागाशिवाय यशस्वी होऊ शकत नाही.वृक्ष लागवड मोहीमेत लोकसहभाग होता म्हणुनच २५५० स्क्वे. किलोमीटर ने महाराष्ट्राचे ग्रीन कव्हर वाढले आहे. आपला जिल्हा नेहमीच अग्रेसर राहिला आहे तेव्हा मनपा आयुक्त विपीन पालीवाल यांनी विविध उपक्रमांद्वारे पुढाकार घ्यावा, निधीची कमतरता पडू देणार नाही.

याप्रसंगी चंद्रपूर विधानसभा क्षेत्राचे आमदार किशोर जोरगेवार यांनी विजेत्या स्पर्धकांच्या प्रभागात कामांसाठी प्रत्येकी १० लाख तर विजयी न होऊ शकणाऱ्या स्पर्धकांच्या प्रभागात विकास कामांसाठी प्रत्येकी ५ लाख देण्याचे घोषित केले.

स्वच्छ भारत अभियान अंतर्गत लोकसहभागातुन १ नोव्हेंबर ते ३० नोव्हेंबर २०२२ या कालावधीत ” शहर स्वच्छता व सौंदर्यीकरण लीग स्पर्धा ” तसेच २३ ते २६ डिसेंबर या काळात राज्यस्तरीय भिंतीचित्र महोत्सव स्पर्धा तसेच जिंगल स्पर्धा,म्युरल आर्ट स्पर्धा, चित्रकला स्पर्धा,पोस्टर मेकींग स्पर्धा, पथनाट्य, शॉर्ट मुव्ही स्पर्धा, निबंध स्पर्धा घेण्यात आल्या होत्या.

यातमुंबई,पुणे,नागपूर,औरंगाबाद,नाशिक,अहमदनगर,अमरावती,वर्धा इत्यादी विविध शहरातील स्पर्धक यात सहभागी झाले होते. दिव्यांग स्पर्धकांचा उत्साह यात प्रकर्षानं पाहावयास मिळाला. स्पर्धेत लोकप्रतिनिधी,स्वयंसेवी, सामाजीक संस्था, युवक/युवती मंडळे इत्यादींनी मोठ्या प्रमाणात सहभाग दर्शविला. स्पर्धेतील निकषांनुसार त्रयस्थ निरीक्षकांद्वारे स्पर्धेचे निरीक्षण करण्यात आले व फेसबुक लाईव्हच्या माध्यमातुन विजेते घोषित करण्यात आले होते.

” वार्ड स्वच्छता व सौंदर्यीकरण स्पर्धा “

विजेते –

१. प्रथम पारितोषिक – योग नृत्य परिवार आझाद गार्डन संघ – १ लक्ष, ट्रॉफी व वार्डासाठी २५ लक्ष रुपयांची विकास व सौंदर्यीकरणाची कामे

२. द्वितीय पारितोषिक – योग नृत्य परिवार राजीव गांधी गार्डन संघ – ७१ हजार,ट्रॉफी व त्या वार्डासाठी १५ लक्ष रुपयांची विकास व सौंदर्यीकरणाची कामे

३. तृतीय पारितोषिक – राष्ट्रसंत तुकडोजी महाराज संघास – ५१ हजार, ट्रॉफी व त्या वार्डासाठी १० लक्ष रुपयांची विकास व सौंदर्यीकरणाची कामे

४. प्रोत्साहनपर बक्षीस – चंद्रपूर बचाव संघर्ष समिती संघास म्हणुन – ३१ हजार, ट्रॉफी व त्या वार्डासाठी ५ लक्ष रुपयांची विकास व सौंदर्यीकरणाची कामे.

५. टाकाऊपासुन टिकाऊ वस्तु – राग आय अप सायकलींग संघ – २१ हजार व ट्रॉफी

६. उत्कृष्ट कार्य -ज्येष्ठ नागरीक संघ महेश नगर यांना – २१ हजार व ट्रॉफी तसेच राजीव गांधी उद्यान पतंजली योग्य समितीस – २१ हजार व ट्रॉफी.

७. कचरा टाकण्याच्या जागेचे सौंदर्यीकरण – योग नृत्य परिवार संजय नगर – २१ हजार व ट्रॉफी

८. ऐतिहासिक धरोहर स्वच्छता – वानर सेना मित्र परिवार – २१ हजार व ट्रॉफी

९. नाविन्यपुर्ण स्वच्छता उपक्रम – साईबाबा मित्र परिवार – २१ हजार व ट्रॉफी

१०. होम कंपोस्टींगद्वारे – डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी स्वच्छता मंडळ तुकूम – २१ हजार व ट्रॉफी

” राज्यस्तरीय भिंतीचित्र महोत्सव स्पर्धा “

समुह गट

१. राकेश धवने, समीर लोखंडे, खुशबू चांभरे – १ लक्ष ५१ हजार

२. सागर राजु, सीमा बावणे – १ लक्ष

३. मनोज बोदडे – ५१ हजार

तसेच १० हजार रुपयांची १० बक्षिसे देण्यात आली.

वैयक्तीक गट

१. अनिल काकडे – ७१ हजार

२. अमित गोनाडे – ५१ हजार

३. सदानंद पचारे – ३१ हजार

व ५ हजार रुपयांची १० बक्षिसे

त्याचप्रमाणे वृक्ष पेंटींग स्पर्धेत अनुक्रमे २१ हजार,१५ हजार, ११ हजार रुपये,क्रीएटीव्ह पेंटींग स्पर्धेत २१ हजार,१५ हजार, ११ हजार रुपयांची तसेच जिंगल स्पर्धा,म्युरल आर्ट स्पर्धा, चित्रकला स्पर्धा,पोस्टर मेकींग स्पर्धा, पथनाट्य, शॉर्ट मुव्ही स्पर्धा, निबंध स्पर्धा इत्यादींचीही बक्षिसे देण्यात आली.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

विभागीय लोकशाही दिनात 2 तक्रारी निकाली

Mon Feb 13 , 2023
नागपूर : विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांच्या अध्यक्षतेखाली विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभाकक्षात आज विभागीय लोकशाही दिन घेण्यात आला. यावेळी प्रलंबित 9 तक्रारींचा आढावा घेण्यात आला. नवीन 2 तक्रारी निकाली काढण्यात आल्यात. यावेळी उपायुक्त प्रदीप कुलकर्णी, तहसिलदार निलेश काळे, तहसिलदार अरविंद सेलोकार यांच्यासह सहकार, आरोग्य, महापालिका, महिला व बाल विकास, भूमापन, लेखा व कोषागारे आदी विभागाचे अधिकारी उपस्थित होते. Follow us […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com