खेळातुनच सांघिक भावना निर्माण होते – गट शिक्षणाधिकारी वंदना हटवार

मोतीराम रहाटे, प्रतिनिधी

तालुकास्तरीय क्रिडा स्पर्धाचे थाटात उद्घाटन. 

कन्हान (नागपुर) :- बालवयातच प्राथमिक स्तरावर क्रिडा स्पर्धाच्या आयोजनातुन खेळाडु निर्माण करण्याचे काम या स्पर्धेच्या माध्यमातुन होऊन खेळातुनच सांघिक भावना निर्माण होते. या सारख्या स्पर्धा सर्वत्र व्हाव्यात असे आवाहन उद्घाटक गटशिक्षणाधिकारी वंदना हटवार यांनी केले.

नागपुर जिल्ह्य़ात प्रथमच आयोजित खाजगी प्राथमिक शाळांच्या तालुका स्तरीय क्रिडा स्पर्धाचे उद्घाटन विकास प्राथमिक शाळेच्या मैदानावर (दि.१७) ला अत्यंत उत्साहात करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक विशाखा ठमके तर प्रमुख पाहुणे म्हणुन शिक्षक नेते व विदर्भ मुख्याध्यापक संघाचे संस्थापक अध्यक्ष मिलिंद वानखेडे, तालुका क्रिडा अधिकारी  दुबळे, समाजसेवक राजेंद्र शेंदरे, धर्मराज विद्यालयाचे मुख्याध्यापक  रमेश साखरकर, ज्येष्ठ पत्रकार  एन एस मालविय, नरेंद्र बेले, पोलीस पाटील  गुंडेराव चकोले, नरेंद्र वाघमारे, ज्ञानप्रकाश यादव उपस्थित होते. प्रथम छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पुजन करून पाहुण्यांच्या हस्ते क्रिडा ज्योत प्रज्वलित करून क्रिडा महोत्सवाचे थाटात उद्घाटन करण्यात आले. यावेळी खाजगी माध्यमिक शाळा व जिल्हा परिषद शाळांच्या क्रिडा स्पर्धा आयोजित करण्यात येतात. मात्र यातुन खाजगी प्राथमिक शाळा वंचित राहत होत्या. प्राथमिकच्या मुलांना मैदानात नेतृत्व करण्याची संधी मिळावी यासाठी विदर्भ मुख्याध्यापक संघ नागपुर विभाग शाखा पारशिवनीच्या सर्व मुख्याध्यापकांनी एकत्र येऊन पारशिवनी तालुका स्तरीय क्रिडा स्पर्धाचे आयोजन हा स्तुत्य उपक्रम असल्याचे मनोगत शिक्षक नेते मिलिंद वानखेडे यांनी व्यक्त केले.

नागपुर जिल्ह्य़ात प्रथमच होणाऱ्या खाजगी प्राथमिक शाळांच्या क्रिडा स्पर्धेला उपस्थित राहण्याचे आवाहन कार्यक्रमाचे आयोजक खाजगी प्राथमिक शाळा तालुका स्तरीय क्रिडा समिती, पारशिवनी व विदर्भ मुख्याध्यापक संघ नागपूर विभाग शाखा पारशिवनीच्या वतीने करण्यात आले होते. कार्यक्रमाचे संचालन खिमेश बढिये यांनी तर आभार  गणेश खोब्रागडे यांनी मानले. कार्यक्रमाच्या आयोजनासाठी मुख्याध्यापक राजेंद्र खंडाईत , मुख्याध्यापक वंदना रामापुरे, सचिव व मुख्याध्यापक खिमेश बढिये, कोषाध्यक्ष व मुख्याध्यापक गणेश खोब्रागडे, मुख्याध्यापक सुनीता देशमुख, मुख्याध्यापक जितेंद्र भांडेकर, मुख्याध्यापक  क्रिस्टीना बमजई, मुख्याध्यापक गौरीशंकर साठवणे, मुख्याध्यापक  रोजमेरी माडास्वामी यांनी सहकार्य केले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी  अभिषेक यादव, अमित मेंघरे, देवेंद्र सेंगर,  भिमराव शिंदेमेश्राम, शारदा समरीत, शशिकांत बोंद्रे, हर्षकला चौधरी, सचिन कनोजिया, आबुल हसन, सैय्यद मतीन, मिरा राय, उदयवीर सिंग, मंगला पाहुणे, वनीता घोडेस्वार, हेमंत वंजारी, अभिषेक मोहनकर, भास्कर सातपुते, आयशा अंसारी, जया पवार, नरेश तेलकंपीवार, प्रशांत वैद्य, लता पेटकर, रुपाली उके, प्रांजल डोकरीमारे, सुरेखा अवचट,  मंगला बावनकुळे, शरद डोकरीमारे, रविकांत गेडाम,  अभिलाषा कावळे, सुनील पवार यांनी आयोजनात व स्पर्धा सुरळीतपणे पार पाडण्यासाठी सहकार्य करित आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

कोल्हापूर चित्रनगरीत अद्ययावत सोयीसुविधा निर्माण करणार - सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार

Thu Jan 19 , 2023
 मुंबई  : गोरेगाव येथील दादासाहेब फाळके चित्रनगरी पाठोपाठ कोल्हापूर चित्रनगरी येथेसुद्धा अनेक मराठी आणि हिंदी मालिका आणि विविध चित्रपटांचे चित्रीकरण सुरु आहे. आगामी काळात कोल्हापूर चित्रनगरीत चित्रीकरणासाठी अद्ययावत सोयीसुविधा निर्माण करण्यात येणार असल्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले.             सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रालयात कोल्हापूर चित्रनगरी महामंडळाच्या संचालक मंडळाची […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!