गुणवत्तापूर्ण आनंददायी शिक्षण देण्यात शिक्षकांची जबाबदारी मोठी – शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे

– शालेय शिक्षण मंत्र्यांची धारावीतील शाळांना भेट

मुंबई :- शालेय शिक्षणात महाराष्ट्र देशात आघाडीवर राहावा यासाठी शासनामार्फत सर्व प्रयत्न करण्यात येत आहेत. या प्रक्रियेत विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण आनंददायी शिक्षण मिळावे यासाठी शिक्षकांवर मोठी जबाबदारी असल्याचे प्रतिपादन शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी केले.

शालेय शिक्षण मंत्री भुसे यांनी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या धारावी काळा किल्ला शाळा संकुलातील मुंबई पब्लिक स्कूल तसेच धारावी ट्रान्झिट कॅम्प मधील इंग्रजी आणि सेमी इंग्रजी शाळांना भेट देऊन पाहणी केली.

यावेळी भुसे यांनी शाळेतील बालवाडीसह अन्य वर्ग, ग्रंथालय, विद्यार्थ्याला वाचन आणि लिहिता येते का, पाढे येतात का, कविता वाचन, विद्यार्थ्याची शारीरिक स्वच्छता याची पाहणी केली. त्यांनी पोषण आहारामध्ये दिले जाणारे अन्न, पिण्याचे पाणी स्वतः तपासले. स्मार्ट क्लासरूम, कंप्युटर लॅब, क्राफ्ट रूम मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना त्याचे योग्य ज्ञान मिळत आहे की नाही ते जाणून घेतले. परिसर स्वच्छता, विद्यार्थी आणि विद्यार्थिनींसाठी असलेली स्वच्छतागृहे तसेच शाळेतील सीसीटीव्ही यांची देखील पाहणी करून मंत्री भुसे यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला.

शाळांची पाहणी केल्यानंतर भुसे यांनी शिक्षक आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांशी चर्चा केली. शाळांमध्ये विद्यादानाचे कार्य चांगल्या पद्धतीने सुरू असल्याबद्दल समाधान व्यक्त करून हा दर्जा असाच कायम राखावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण आनंददायी शिक्षण मिळावे यासाठी शिक्षकांवर मोठी जबाबदारी असल्याचे सांगून समाजातील कोणत्याही घटकातील विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये, यासाठी सर्वांनी मिळून प्रयत्न करावेत, असे आवाहनही त्यांनी केले.

यावेळी बृहन्मुंबई महानगरपालिकेचे शिक्षणाधिकारी राजेश कंकाळ, जी उत्तर वार्ड च्या प्रशासकीय अधिकारी स्नेहलता डुंबरे, शाळेतील वर्ग शिक्षक यांनी शालेय शिक्षणमंत्री भुसे यांना शाळेविषयी सविस्तर माहिती दिली.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

भारतीय राज्यघटनेच्या 75 व्या वर्षपूर्तीनिमित्त "संविधान गौरव महोत्सव" - उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील 

Tue Jan 28 , 2025
– सहा हजार महाविद्यालयांमध्ये विविध उपक्रमांचे आयोजन मुंबई :- भारतीय राज्यघटनेच्या ७५ वर्षांच्या ऐतिहासिक पर्वानिमित्त राज्यातील सहा हजारपेक्षा अधिक महाविद्यालयांमध्ये फेब्रुवारीमध्ये संपूर्ण महिनाभर “संविधान गौरव महोत्सव” निमित्ताने विविध उपक्रमाचे आयोजन करणार असल्याची माहिती उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली. उच्च व तंत्रशिक्षण मंत्री पाटील म्हणाले, भारतीय राज्यघटनेने भारताला एक सार्वभौम, लोकशाही प्रजासत्ताक म्हणून स्थापित केले. भारताच्या इतिहासातील या […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!