चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे शिक्षक सक्षमीकरण कार्यशाळा , मनपाचे ८० शिक्षक सहभागी

चंद्रपूर : – केंद्रशासन चेतना विकास मूल्य शिक्षण शिक्षक सक्षमीकरण कार्यशाळेचे उदघाटन आयुक्त विपीन पालीवाल यांच्या हस्ते ७ नोव्हेंबर रोजी संपन्न झाले. चंद्रपूर महानगरपालिका शिक्षण विभागातर्फे सदर कार्यशाळा ७ नोव्हेंबर ते १० नोव्हेंबर २०२२ पर्यंत डाॅ.शामाप्रसाद मुखर्जी सार्वजनीक वाचनालय येथे आयोजित करण्यात आली आहे

याप्रसंगी मार्गदर्शन करतांना आयुक्त विपीन पालीवाल म्हणाले की, आज आधुनिकीकरण झपाटयाने होत आहे. लहान मुलांना मोबाइल, गाडी इत्यादी वस्तु सहज मिळत आहे आणि एखाद्या वस्तुचे फायदे नुकसान समजण्याआधीच ती वस्तु जर वापरायला उपलब्ध असेल तर नुकसान निश्चित आहे, मग ते शारीरीक,आर्थिक वा बौद्धिकही असु शकते. हे बदल झपाटयाने घडत आहेत तर मग आपली शिक्षण पद्धती हे बदल आत्मसात करत आहेत का ? याचे चिंतन आवश्यक आहे. 

पाठ्यपुस्तकांद्वारे दिले जाणारे शिक्षण आणि शिक्षित असलेल्या लोकांची सामाजीक वर्तणुक यामध्ये तफावत आढळुन येते. ही तफावत कमी करण्यास विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकी ज्ञान न देता समाजाचा सांस्कृतीक वारसा व मूल्यपद्धती यांची शिकवण आधुनिक तंत्रज्ञानाला जोडुन द्यायचा प्रयत्न करावयास हवा. शिक्षक स्वतः शिकणे व इतरांना शिकविणे जीवनभर थांबवु शकत नाही.ही शिक्षकांची बांधिलकी आहे आणि ते ती जपतात.

या कार्यशाळेला प्रमुख अतिथी म्हणुन जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्था चंद्रपूरचे प्राचार्य राजकुमार हिवारे, तज्ज्ञ मार्गदर्शक प्रा.रविंद्र तामगाडगे, मनपा शिक्षणाधिकारी नागेश नित ,उद्धव राठोड, येवले उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन  उमा कुकडपवार यांनी केले तर आभार प्रदर्शन सुनिल आत्राम यांनी मानले या कार्यशाळेला महानगरपालिकेचे ८० शिक्षक सहभागी झाले आहेत.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

विद्यापीठात उद्या 8 नोव्हेंबर पासून कबड्डी (महिला) आंतर विद्यापीठ सामने

Mon Nov 7 , 2022
गुजरात, मध्यप्रदेश, गोवा, राजस्थान, महाराष्ट्र या 5 राज्यातील 66 संघांचा सहभाग अमरावती :- संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाच्या क्रीडा संकुलावर उद्यापासून पश्चिम विभागीय आंतर विद्यापीठ कबड्डी (महिला) स्पर्धांचे भव्य आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धा दिनांक 8 ते 11 नोव्हेंबर या कालावधीत आयोजित करण्यात आल्या आहेत. गोवा, गुजरात, मध्यप्रदेश, राजस्थान आणि महाराष्ट्र या राज्यातून सुमारे 66 संघ या स्पर्धेत आपले कौशल्य […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!