गैरहजर स्वच्छता कर्मचाऱ्यांवर कारवाई करा – मनपा आयुक्त

– लक्ष्मीनगर आणि धरमपेठ झोन मधील स्वच्छता कार्याची पाहणी

नागपूर :- नागपूर महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी सोमवारी (ता.९) सकाळी लक्ष्मीनगर आणि धरमपेठ झोनमधील स्वच्छता कार्याची पाहणी केली. त्यांनी कामावर गैरहजर असलेल्या कामचुकार स्वच्छता कर्मचाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचे निर्देश झोनचे उपायुक्त मिलिंद मेश्राम आणि प्रकाश वराडे यांना दिले. त्यांनी हजेरी स्टॅंडमध्ये कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीचा आढावा घेतला आणि पूर्वसूचनेविना गैरहजर कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस देण्याचे निर्देश दिले.

आयुक्तांनी आठ रास्ता चौक, आर.एस. कॉन्व्हेंट, बजाज नगर आणि इतर ठिकाणी स्वच्छता कार्याची पाहणी केली. या पाहणी दरम्यान त्यांनी कुठेही कचऱ्याचे ढिगारे दिसू नये, याबाबत सक्त ताकीद दिली. हिरवा कचरा (Green West) त्वरित उचलला जावा याकरिता अतिरिक्त यंत्रणा उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

सफाई कर्मचाऱ्यांद्वारे उचलण्यात आलेला कचरा पुन:श्च प्रभागात सार्वजनिक जागी कचरा न टाकता थेट भांडेवाडी डम्पिंग यार्ड ला पाठविणे आवश्यक आहे. यासाठी कंत्राटदारांनी कॉम्पॅक्टरद्वारे कचरा थेट भांडेवाडी डम्पिंग यार्डला पाठविण्या संबंधी आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी स्पष्ट निर्देश दिले.

लक्ष्मीनगर आणि धरमपेठ झोनमधील दररोज गैरहजर राहणाऱ्या कामचुकार कर्मचाऱ्यांवर सक्त कारवाई करण्याबाबत मनपा आयुक्तांनी, उपायुक्त तथा संचालक घनकचरा व्यवस्थापन विभागाचे डॉ.गजेंद्र महल्ले, झोनल स्वच्छता अधिकारी रामभाऊ तिडके, दीनदयाल टेंभेकर आणि स्वच्छता निरीक्षक राजेंद्र शेट्टी तसेच सहायक आयुक्तांची जबाबदारी निश्चित केली आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

गणपती मंडळातील रक्तदान शिबिरात अधिकाऱ्यांचे रक्तदान

Tue Sep 10 , 2024
– सकारात्मक ऊर्जेने मोठ्या संख्येने रक्तदान करण्याचे आवाहन नागपूर :- गणेशोत्सवानिमित्त रक्तदान जनजागृती करीत नागपूर महानगरपालिका आणि जिल्हा प्रशासनाद्वारे विदर्भ इन्फोटेक प्रा.लिमिटेडचा (व्हीआयपीएल) राजा आयटी पार्क, गायत्री नगर येथे सोमवारी (ता.९) अर्पण ब्लड बँकच्या सहकार्याने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. नागपूर शहरात रक्ताचा तुटवडा भरुन काढण्यासाठी विविध ठिकाणी सार्वजनिक गणपती मंडळात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात येत आहे. या उत्साहाच्या […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com