रमाई सार्वजनिक ग्रंथालयात स्पर्धा परिक्षा मार्गदर्शन संपन्न

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

कन्हान :- गणेश नगर येथिल रमाई सार्वजनिक ग्रंथालय येथे अमर बागडे व डॉ दीपक रामटेके हयानी स्पर्धा परिक्षा विद्यार्थ्याना आयएएस, एमपी एससी चे मौलिक मार्गदर्शन केले.

रमाई सार्वजनिक ग्रंथालय गणेश नगर कन्हान येथे विद्यार्थ्यांनी स्पर्धात्मक परिक्षेची तयारी कशी करावी आणि आयएएस, एमपीएससी यासाठी कसे प्रयत्न करावे. याचे अत्यंत मौलिक मार्गदर्शन अमर बागडे स्टेशन मॅनेजर खापरखेडा आणि डॉ. दीपक रामटेके नागपुर यांनी केले. कार्यक्रमास संस्थेचे अध्यक्ष आयु. मंडपे आणि माला मंडपे प्रामुख्याने उपस्थित होत्या. यावेळी ४० विद्यार्थ्यांनी मार्ग दर्शनाचा लाभ घेतला. कार्यक्रमाचे संचालन रिंकु मेश्राम हिने तर आभार गाथा राऊत हिने केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी प्रफुल्ल मोरे यांनी परिश्रम घेतले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

नागपूर जिल्ह्यामध्ये मराठा समाज व खुल्या प्रवर्गातील नागरिकांच्या सर्वेक्षणाला सुरुवात

Wed Jan 24 , 2024
*१३ तालुक्यात ६ हजार ६७८ कर्मचारी लागले कामाला*  नागपूर :- नागपूर जिल्ह्यातील तेराही तालुक्यामध्ये मराठा समाज व खुल्या प्रवर्गातील नागरिकांच्या सर्वेक्षणासाठी आज सुरुवात झाली आहे. नागपूर जिल्ह्यामध्ये 4, लाख 42 हजार 897 घरातील 22 लाख 14 हजार 485 लोकसंख्या तपासली जाणार आहे. राज्य मागासवर्गीय आयोगाने नेमून दिलेल्या सूचनानुसार हे सर्वेक्षण करण्यात येणार आहे. जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी या संदर्भातील […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com