नागपूर :- स्वच्छ भारत अभियान अंतर्गत नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने शुक्रवार (ता.25) 13 प्रतिष्ठानांवर कारवाई करून 75 हजार रुपयांचा दंड वसूल केला. लक्ष्मीनगर झोनच्या उपद्रव शोध पथकाद्वारे मे. श्रीकृपा रेसिडेंसी, छत्रपती नगर, नागपूर यांच्यावर रस्त्यालगत बांधकाम साहित्य पसरविल्याबद्दल कारवाई करून 10 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. धरमपेठ झोनच्या उपद्रव शोध पथकाद्वारे मे. मिल्टन, सुदामा टॉकीज मागे,नागपूर रस्त्यावर सांडपाणी आणि चिखल पसरविल्याबद्दल कारवाई करून 5 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. मे. रेणूका ज्वेलर्स, सुरेन्द्रगढ, नागपूर यांच्यावर इलेक्ट्रीक पोलवर अनधिकृतपणे बॅनर व होर्डींग लावल्याबाबत 5 हजार दंड वसूल करण्यात आला.
तसेच मे. विन्द्रावन कंन्स्ट्रक्शन, खरे टाऊन, नागपूर रस्त्यालगत/फुटपाथजवळ कचरा टाकल्याबद्दल कारवाई करून 5 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. हनुमान नगर झोनच्या उपद्रव शोध पथकाद्वारे मे. आर्यासाई बिल्डकॉन, नरसाळा रोड, नागपूर व मे. साई अभ्याशिका, न्यु सुभेदार, नागपूर यांच्यावर इलेक्ट्रीक पोलवर अनधिकृतपणे बॅनर व होर्डींग लावल्याबाबत प्रत्येकी 5 हजार दंड वसूल करण्यात आला. गांधीबाग झोनच्या उपद्रव शोध पथकाद्वारे मे. ईश्वर किराणा, इतवारी, नागपूर यांच्यावर प्लास्टिक पिशवीच्या वापर केल्याबद्दल कारवाई करून ५ हजार रुपयांचा दंड वसूल केला. व शोयब राशीद, लाल इमली चौक, नागपूर यांच्यावर फूटपाथ/रस्त्यावर झाडांच्या फांद्या तोडूण कचरा पसरविल्याबद्दल कारवाई करून 5 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. सतरंजीपुरा झोनच्या उपद्रव शोध पथकाद्वारे मे. देवहरे सोनपापडी, कावळापेठ व मे. जय ट्रेडींग, हनुमान मंदीर, नागपूर यांच्यावर प्लास्टिक पिशवीच्या वापर केल्याबद्दल कारवाई करून प्रत्येकी ५ हजार रुपयांचा दंड वसूल केला. लकडगंज झोनच्या उपद्रव शोध पथकाद्वारे मे. प्रभु गुरु उद्योग, ओमसाई नगर, कलमना, नागपूर यांच्यावर प्लास्टिक पिशवीच्या वापर केल्याबद्दल कारवाई करून प्रत्येकी ५ हजार रुपयांचा दंड वसूल केला. मंगलवारी झोनच्या उपद्रव शोध पथकाद्वारे मे. बुटीक अपार्टमेंट, बैरामजी टाऊन, नागपूर रस्त्यालगत बांधकाम साहित्य पसरविल्याबद्दल कारवाई करून 10 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. व मे. मन्ता क्लिनीक, उत्तन नगर, नागपूर वैद्यकीय कचरा अनधिकृत जागेवर टाकल्याबद्दल कारवाई करून 5 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. ही कारवाई उपद्रव शोध पथक प्रमुख वीरसेन तांबे यांच्या नेतृत्वात करण्यात आली.