
नागपूर :-भारत स्काउट गाइड फेलोशिप जिल्हा नागपुर द्वारा शनिवार 24 व 25/12/2022 ला एक दिवस व एक रात्र शिबीर (कॅम्प) भारत स्काउट गाइड ट्रेनिंग सेंटर रामटेक नागार्जुन येथे संपन्न झाला. या शिबीराचे मुख्य आयोजक रविकांत खोब्रागडे, संतोष लोणारे, नागसेन भैसारे व रमेश नागदवने होते.
या शिबीरात नागपूर नार्थ स्काउट गाइड ओपन ग्रूप, आदर्श स्काउट गाइड ओपन ग्रूप, प्रगति स्काउट गाइड ओपन ग्रूप, बिकन स्काउट गाइड ओपन ग्रूप या सर्व ओपन ग्रूपच्या 25 ते 30 वर्षों आदि जे स्काउट होते त्या स्काउटनी सहभाग घेतला. शिबीर (कॅम्प) मधे तंबू उभारणे, तंबू परिसर स्वच्छ ठेवणे, पदशोभा यात्रा, ट्रेकिंग, तंबू निरिक्षण व सेकोटी कार्यक्रम मधे सांस्कृतिक व अन्य विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले.

या कार्यक्रमाला अशोक बोंदाळे, संजीवन वालदे गुरुजी, सुनिल गणेर, अविनाश भालेरावांनी शिबिर (कॅम्प) च्या उदघाटन पासुन तर शिबीर (कॅम्प) समारोह पर्यंत सहकार्य केले. शिबीर (कॅम्प) करते वेळी स्काउटना सर्व जुन्या आठवणी समोर उभ्या दिसत आल्या व सर्वांनी हसत-खेळत, मस्त मज़ा करीत शिबीर (कॅम्प) मध्ये संपुर्ण सहकार्य केले व शिबीर (कॅम्प) ला संपन्न केले.

एक दिवस एक रात्र शिबीरात आलेले स्काउट राजवंत बागडे, प्रदिप खोब्रागड़े, भारत लाडे, प्रितम टेंभुर्णे, विजय जनबंधू, दिपक दरवाडे, गुणवंत सोनटक्के, रवि घरडे, प्रविण मेश्राम, धिरज वाघमारे, सचिन चव्हाण, सचिन अंबादे, गौतम अंबादे, अमोल पाटील, रोशन गजभिये, विद्यानंद रंगारी, रोशन कांबळे, श्रिधर जांभुळकर, श्रमण साखरे, प्रविण राऊत, नितिन कांबळे, धर्मेंद्र (धम्मा) मेश्राम, दिप पंचभावे, कुणाल सोनटक्के, विशाल साखरे, हेमराज टेंभुर्णे, रोशन रामटेके, गणेश मेश्राम, अमोल खोब्रागड़े रोशन राऊत, संजय निमगडे. शिबीर (कॅम्प) चे मुख्य आयोजक समितिचे आयोजक रविकांत खोब्रागडे यांनी सर्व आलेल्या स्काउटचे मनापासुन आभार व्यक्त केले व शिबीर (कॅम्प) ची समाप्तीची घोषणा केली.