स्वच्छ भारत अभियान : शोध पथकाची कारवाई

नागपूर :- स्वच्छ भारत अभियान अंतर्गत नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने बुधवार (ता.26) 10 प्रतिष्ठानांवर कारवाई करून 70 हजार रुपयांचा दंड वसूल केला. धरमपेठ झोनच्या उपद्रव शोध पथकाद्वारे मे. राधे संदेश इन्फ्रा, सुदामा टॉकीज मागे, धरमपेठ, नागपूर यांच्यावर रस्त्यालगत बांधकाम साहित्य पसरविल्याबद्दल कारवाई करून 10 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. तसेच मे. पेटेर क्लासेस, गांधी नगर, नागपूर व मे. रामेकर सायन्स अकॅडमी, आकार नगर, नागपूर यांच्यावर इलेक्ट्रीक पोलवर अनधिकृतपणे बॅनर व होर्डींग लावल्याबाबत कारवाई करून प्रत्येकी 5 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.

धंतोली झोनच्या उपद्रव शोध पथकाद्वारे मे. श्याम रियल इस्टेट, नरेन्द्र, नगर, नागपूर यांच्यावर रस्त्यालगत बांधकाम साहित्य पसरविल्याबद्दल कारवाई करून 10 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. सतरंजीपुरा झोनच्या उपद्रव शोध पथकाद्वारे मे. हर्ष स्विटस, वृंदावन नगर, नागपूर यांच्यावर प्लास्टिक पिशवीच्या वापर केल्याबद्दल कारवाई करून ५ हजार रुपयांचा दंड वसूल केला. मंगलवारी झोनच्या उपद्रव शोध पथकाद्वारे मे. तवानी टुटोरीयल व मे. फुल मार्केट, मंगलवारी बाजार, सदर, नागपूर यांच्यावर प्लास्टिक पिशवीच्या वापर केल्याबद्दल कारवाई करून प्रत्येकी 10 हजार रुपयांचा दंड वसूल केला. तसेच मे. अल अमिन इंग्लीश स्कुल, मंगलवारी बाजार, सदर, मे. आर्या कंम्प्युटर्स क्लासेस, बोरगाव चौक व मे. खानवे क्लासेस,महेश नगर, नागपूर यांच्यावर प्लास्टिक पिशवीच्या वापर केल्याबद्दल कारवाई करून प्रत्येकी ५ हजार रुपयांचा दंड वसूल केला. ही कारवाई उपद्रव शोध पथक प्रमुख वीरसेन तांबे यांच्या नेतृत्वात करण्यात आली.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

... अंततः अतिक्रमण हटानेका लेखी आश्वासन के बाद महिला ने उपोषण लिया पीछे

Thu Jul 27 , 2023
– तहसील शिवसेना प्रमुख प्रशांत भुरे के प्रयासो को सफलता . कोदामेंढी :- यहा 27 जून से उपोषण कर रही महिला बबिता आप्तूरकर ने उपोषण तहसील शिवसेना प्रमुख प्रशांत बाळासाहेब भुरे के प्रयासोसे पीछे लिया. उनके घर के पास सरकारी जमीन पर दुसरे व्यक्तीने अतिक्रमण करके झोपडी बनाई थी. वह अतिक्रमण ग्रामपंचायत ने हटाकर वह जमीन अतिक्रमण मुक्त करने की […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!