राज्य स्तरिय तिरंदाजी स्पर्धेत जीनात गजभिये ला कास्य पदक

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी

कन्हान : – राज्य स्तरीय तिरंदाजी स्पर्धा हिंगोली येथे संपन्न होऊन यात नागपूर जिल्ह्याचे प्रतिनिधीत्व करि त कुर्वे आर्चरी क्लब नागपूर चा तिरंदाज जीनात गजभिये याने नऊ वर्षांवरील वयोगटात उत्कृष्ट काम गीरी करीत कास्य पदक मिळवुन राष्ट्रीय तिरंदाजी स्पर्धेत प्रवेश निश्चित केला आहे.
बुधवार (दि.१८) मे २०२२ ला महाराष्ट्र राज्य तिरंदाजी असोसीएशन द्वारे हिंगोली येथील बरसत येथे राज्य स्तरीय तिरंदाजी स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. स्पर्धेत महाराष्ट्र राज्यातील वेगवेगळ्या जिल्ह्यातील एकुण २४० तिरंदाज खेळाडूंनी सहभाग घेतला होता. राज्य स्तरीय तिरंदाजी स्पर्धेत नागपूर जिल्ह्यातील प्रतिनिधीत्व केलेल्या कुर्वे आर्चरी क्लब नागपूर येथील तिरंदाज (Archer) जिनात राहुल गजभिये याने नऊ वर्षांवरील वयोगटात उत्कृष्ट काम गीरी करीत कास्य पदक प्राप्त करून राजामुंद्री (आंध्र प्रदेश) येथे होणाऱ्या राष्ट्रीय तिरंदाजी स्पर्धेत स्थान प्राप्त करित प्रवेश निश्चित केला आहे. स्पर्धेचे आयोज न रंगाराओ साळुंके हयानी केले होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मिशनचे उपाध्यक्ष अँड.भिमराव गजभिये यांचा नातु जिनात मुळे नागपूरचे नाव हे राज्य पातळी वर चमकले असुन जिनात च्या यशामध्ये त्याच्या पाल कांचे आणि कुर्वे आर्चरी कल्ब नागपूरचे मुख्य प्रशिक्ष क देवीदास कुर्वे यांचा मौलाचा वाटा आहे. तसेत संदीप काळे, सत्यजीत सर यांचे वेळोवेळी मार्गदर्शन मिळाले आहे. स्पर्धेचे बक्षीस वितरण महाराष्ट्र तिरंदा जी असोसिएशन्सचे सचिव प्रमोद चांदूरकर हयानी स्पर्धेचे संचालन आणि आभार प्रदर्शन रंगाराओ साळुंके हयांनी केले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

कांद्री सरपंच, उपसरपंच व सर्व सदस्यानी स्वखर्चातुन अपंग रितेश ला लॅपटॉप दिला

Fri May 20 , 2022
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी कन्हान : – ग्रा.पं. कांद्री येथील सरपंच, उपसरपंच व सर्व सदस्य यांनी मानुष्की जपत आपल्या स्वखर्चातुन वॉर्ड क्र.४ कांद्री येथील अपंग मुलगा रितेश प्रसाद या मुलाला लॅपटॉप सप्रेम भेट देत मौलिक सेवाभावी कार्य केले. रितेश हा एका डोळ्याने आंधळा असून त्याची घरची परिस्थिती ही हलाखीची आहे. तो सध्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर कॉलेज दीक्षाभुमी नागपूर येथे शिकत […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com