संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
-67 हजार 800 रुपयांचा मुद्देमाल जप्त
कामठी ता प्र 20 :- स्थानिक जुनी कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या बडा पुलिया वारीसपुरा जवळ जुनी कामठी पोलिसांनी दुचाकीने अवैधरित्या एम डी ची वाहतूक करणाऱ्या आरोपीस अटक करण्यात यश गाठल्याची कारवाही गतरात्री दीड वाजेदरम्यान केली असून या धाडीतून 15 हजार रुपये किमतीचा 3 ग्राम एम डी, एकटीवा दुचाकी , नगदी 4800 रुपये व ओपो कंपनीचा मोबाईल असा एकूण 67 हजार 800 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला तर अटक आरोपीचे नाव तहसीन कमाल मो अल्ताफ वय 32 वर्षे रा तुमडीपुरा कामठी तर एक आरोपी अजूनही अटकेबाहेर आहे.
पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे नागपूर हुन कामठी कडे एका दुचाकीने एम डी ची अवैधरित्या वाहतूक होत असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळताच पोलिसांनी यशस्वीरीत्या सापळा रचून सदर घटनास्थळी अटक आरोपीची दुचाकी क्र एम एच 49 एस 5039 थांबवून दुचाकींची झडती घेतली असता दुचाकीमध्ये लपवून ठेवलेल्या प्लास्टिक च्या प्रेस लॉक पिशवीत तीन ग्रॅम एम डी जप्त करण्यात आली तसेच इतर साहित्य सुद्धा जप्त करण्यात आले.यानुसार एकूण 67 हजार 800 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
ही यशस्वी कारवाही एसीपी नयन आलूरकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल शिरे, डी बी स्कॉड चे इंचार्ज पोलीस उपनिरीक्षक के बी माकने, एपीआय आर गाढवे, डी बी स्कॉड चे संजय गीते,अंकुश गजभिये, श्रीकांत विष्णुरकर, महेश कठाने यांनी केली असून पुढील तपास सुरू आहे.