स्वच्छ भारत अभियान : शोध पथकाची कारवाई

नागपूर :- स्वच्छ भारत अभियान अंतर्गत नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने मंगळवार (ता.11) 11 प्रतिष्ठानांवर कारवाई करून 70 हजार रुपयांचा दंड वसूल केला. धरमपेठ झोनच्या उपद्रव शोध पथकाद्वारे मे. अमित जैन, धरमपेठ, नागपूर यांच्यावर रस्त्यालगत बांधकाम साहित्य पसरविल्याबद्दल कारवाई करून 10 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. हनुमान नगर झोनच्या उपद्रव शोध पथकाद्वारे मे. ओयो अशोका इन, व मे. फर्स्ट स्टेप कॉन्वेंट, हुडकेश्वर, नागपूर यांच्यावर इलेक्ट्रीक पोलवर अनधिकृतपणे बॅनर व होर्डींग लावल्याबाबत प्रत्येकी 5 हजार दंड वसूल करण्यात आला. धंतोली झोनच्या उपद्रव शोध पथकाद्वारे मे. आकार रेसीडेंन्सी, मनिष नगर, नागपूर, यांच्यावर रस्त्यालगत बांधकाम साहित्य पसरविल्याबद्दल कारवाई करून 10 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.

गांधीबाग झोनच्या उपद्रव शोध पथकाद्वारे मे. रविन्द्र किराणा स्टोर्स, व साईबाबा स्विटस, टिमकी, मोमिनपूरा, नागपूर यांच्यावर प्लास्टिक पिशवीच्या वापर केल्याबद्दल कारवाई करून प्रत्येकी ५ हजार रुपयांचा दंड वसूल केला. सतरंजीपुरा झोनच्या उपद्रव शोध पथकाद्वारे मे. हर्ष स्विटस, जामदारवाडी, नागपूर यांच्यावर प्लास्टिक पिशवीच्या वापर केल्याबद्दल कारवाई करून ५ हजार रुपयांचा दंड वसूल केला. आसीनगर झोनच्या उपद्रव शोध पथकाद्वारे मे. ओम कंन्स्ट्रक्शन, बुध्द नगर, अशोक चौक, नागपूर यांच्यावर रस्त्यालगत बांधकाम साहित्य पसरविल्याबद्दल कारवाई करून 10 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. मंगळवारी झोनच्या उपद्रव शोध पथकाद्वारे मे. लावेश टयुशन क्लासेस, गडडीगोदाम चौक व प्रकृती पॉलिक्लिनीक, इरोस सोसायटी, ओम नगर, गोधनी, नागपूर इलेक्ट्रीक पोलवर अनधिकृतपणे बॅनर व होर्डींग लावल्याबाबत प्रत्येकी 5 हजार दंड वसूल करण्यात आला. ही कारवाई उपद्रव शोध पथक प्रमुख वीरसेन तांबे यांच्या नेतृत्वात करण्यात आली.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

Sports For All (SFA) strengthens commitment to enhance India’s grassroots sport ecosystem

Wed Jul 12 , 2023
Nagpur :- Sports For All (SFA), India’s leading tech-enabled multi-sport grassroots competition platform emphasizes on promoting sports at grassroots level, across the country. With its commitment towards strengthening India’s sporting DNA and a strong focus on supporting the government’s mission for a thriving sporting culture, SFA is expanding its presence to Nagpur. The key focus areas for SFA have been […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com