नागपूर : स्वच्छ भारत अभियान अंतर्गत नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने मंगळवार ता. 13) 6 प्रतिष्ठानांवर कारवाई करून 40 हजार रुपयांचा दंड वसूल केला. मनपा आयुक्त तथा प्रशासक राधाकृष्णन बी. यांच्या मार्गदर्शनात धंतोली झोनच्या उपद्रव शोध पथकाद्वारे मे. दत्तात्रेय बिल्डर्स, मानेवाडा रिंग रोड, नागपूर यांच्यावर रस्त्यालगत बांधकाम साहित्य पसरविल्याबद्दल कारवाई करून 10 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.तसेच मे. महेश टुरीस्ट रिसेप्शन सेंटर, कॉटन मार्केट, नागपूर यांच्यावर लॉजचा कचरा आजूबाजूच्या परिसरात मोठ्या प्रमाणात पसरविल्याबद्दल कारवाई करून 5 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.
सतरंजीपुरा झोनच्या उपद्रव शोध पथकाद्वारे अनुश स्विटस, तांडापेठ, इतवारी, नागपूर या दुकानावर प्लास्टिक पिशवीच्या वापर केल्याबद्दल कारवाई करून ५ हजार रुपयांचा दंड वसूल केला. लकडगंज झोन अंतर्गत श्यामलाल, मिनी माता नगर, नागपूर यांच्यावर प्लास्टिक पिशवीच्या वापर केल्याबद्दल कारवाई करून ५ हजार रुपयांचा दंड वसूल केला. आसीनगर झोनच्या उपद्रव शोध पथकाद्वारे मे. शिवालीक इन्फ्रा, भोसलेवाडी, लष्करीबाग, नागपूर यांच्यावर रस्त्यालगत बांधकाम साहित्य पसरविल्याबद्दल कारवाई करून 10 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.तसेच मे. जनाब मोहम्मद जुनैद, वैशाली नगर, नागपूर यांच्यावर बांधकाम साहित्य साठवून ठेवल्यामुळे ड्रेनेज लाईन ब्लॉक झाल्याबद्दल कारवाई करून 5 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. ही कारवाई उपद्रव शोध पथक प्रमुख वीरसेन तांबे यांच्या नेतृत्वात करण्यात आली.