मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून हर्षदा गरुड हिचे अभिनंदन

 

वेटलिफ्टिंगमध्ये पटकावले सुवर्णपदक

मुंबई, दि. ३ :-जागतिक ज्युनियर वेटलिफ्टिंग स्पर्धेत सुवर्णपदक पटकावणाऱ्या पुण्याच्या हर्षदा गरुड हिचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अभिनंदन केले आहे.

मावळमधील (जि. पुणे) हर्षदाने ग्रीस- हेराकिलॉन येथील स्पर्धेत भारतासाठी पहिले सुवर्णपदक पटकावण्याचा पराक्रम केला आहे. या स्पर्धेत भारताने यापुर्वी असे सुवर्णपदक जिंकले नव्हते. त्यामुळे हर्षदाने भारताच्या आणि महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा ठरेल अशी कामगिरी केली आहे. “महाराष्ट्र कन्ये”चा हा पराक्रम आपल्या सर्वांसाठी अभिमानास्पद असल्याचे नमूद करून मुख्यमंत्र्यांनी हर्षदाला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

रेल्वे परिसरातील अतिक्रमणाच्या पुनर्वसनाबाबत नव्याने प्रस्ताव पाठवा : पालकमंत्री डॉ. नितीन राऊत

Tue May 3 , 2022
जुना जरिपटका, भिमनगर झोपडपट्टी भागातील अतिक्रमण संदर्भात बैठक  ईसाई कब्रस्थान व मुस्लीम लायब्ररी  लीजवर जागा व संरक्षण देणार नागपूर : जुना जरीपटका भीम नगर झोपडपट्टी या भागातील नागरिकांचे अतिक्रमण हटवताना रेल्वे मंत्रालयाने दिलेल्या पुनर्वसनाच्या प्रकल्पाबाबत नवा प्रस्ताव सादर करण्याची सूचना ऊर्जा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ.नितीन राऊत यांनी आज येथे केली. या परिसरातील जुन्या अतिक्रमणाला हटवताना रेल्वे बोर्डाला नवा प्रस्ताव […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com