स्वच्छ भारत अभियान : प्लास्टिक विरुध्द मनपाची धडक कारवाई

नागपूर :- स्वच्छ भारत अभियान अंतर्गत नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने गुरुवारी (ता.8) 05 प्रतिष्ठानांवर कारवाई करून 60 हजार रुपयांचा दंड वसूल केला. मनपा आयुक्त तथा प्रशासक राधाकृष्णन बी. यांच्या मार्गदर्शनात गांधीबाग झोनच्या उपद्रव शोध पथकाद्वारे प्रतिबंधित प्लास्टिक पिशवी संदर्भात 1 प्रतिष्ठानांवर करून 5,000/- रुपयांचा दंड वसूल करण्यात आला तसेच 3 किलो प्लास्टिक जप्त करण्यात आले.उपद्रव शोध पथकाने प्लास्टिक पिशवीच्या वापराबद्दल गांधीबाग झोन अंतर्गत टेलीफोन एक्सचेंज चौक येथील अनिल किराणा ट्रेडर्स या दुकानाविरुध्द कारवाई करून 5 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.त्याचप्रमाणे धरमपेठ झोन अंतर्गत लोकमत चौक, वर्धा रोड येथील जे.के.कन्स्ट्रक्शन यांच्याविरुध्द बांधकाम साहित्य रस्त्यालगत पसरविल्याबद्दल कारवाई करून 10 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. धंतोली झोन अंतर्गत ग्रेट नाग रोड, बैधनाथ चौक येथील अनिल भर्तीया (बिल्डर्स) यांच्याविरुध्द बांधकाम साहित्य रस्त्यालगत पसरविल्याबद्दल कारवाई करून 10 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. नेहरुनगर झोन अंतर्गत सक्करदरा मार्केट येथील ग्लोबल सिटी नर्सिंग यांच्याविरुध्द सामान्य कच-यासोबत बायो-मेडिकल वेस्ट कचरा टाकल्याबद्दल कारवाई करून 25 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. तसेच डायमंड नगर, दिघोरी उमरेड रोड येथील BSW Builders यांच्याविरुध्द बांधकाम साहित्य रस्त्यालगत पसरविल्याबद्दल कारवाई करून 10 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. ही कारवाई उपद्रव शोध पथक प्रमुख वीरसेन तांबे यांच्या नेतृत्वात करण्यात आली.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

संतशिरोमणी संत संताजी जगनाडे महाराज जयंती निमित्त म.न.पा.तर्फे विनम्र अभिवादन 

Fri Dec 9 , 2022
नागपूर :-  समाजाला कीर्तन -अभंगाच्या माध्यमातुन मानवता आणि लोककल्याणाची शिकवणी देणारे संत श्री. संताजी जगनाडे महाराज यांच्या 398 व्या जयंती निमित्त नागपूर महानगरपालिकेच्या वतीने म.न.पा. केंद्रीय कार्यालयातील मुख्य दालनातील संत संताजी जगनाडे महाराज यांच्या तैलचित्राला उपायुक्त निर्भय जैन यांनी माल्यार्पण करुन विनम्र अभिवादन केले. या प्रसंगी अमोल तपासे, कैलाश लांडे, संताजी नवयुवक मंडाळचे ‍ पदाधिकारी सुभाष घाटे, मंगेश सातपूते, विनोद […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!